मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम; एमएमआरडीएने थेट तारीखच सांगितली

Published on -

Mumbai News : राजधानी मुंबई आणि उपनगरात सध्या रस्ते विकासाची कामे जोरात सुरू आहेत. सागरी पूल, कोस्टल रोड, उड्डाणपूल, भुयारी मार्ग इत्यादी रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यासोबतच दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी लोकलचा विस्तार केला जात आहे तसेच मेट्रो मार्गाचा देखील विस्तार केला जात आहे. राजधानीमधील या कनेक्टिव्हिटीच्या कामात राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एम एम आर डी ए चा मोठा वाटा आहे.

दरम्यान एमएमआरडीएने हाती घेतलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. वास्तविक, हा प्रकल्प 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार असं एम एम आर डी ए च्या माध्यमातून सांगितले गेले आहे. पण या प्रकल्पांतर्गत येणारी सुविधा उभारण्याचे काम हे ऑगस्टपर्यंत सुरूच राहणार आहे. अर्थातच या प्रकल्पासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा हवामान अंदाज पुन्हा ठरला खरा ! पावसाला सुरवात; आजपासून ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस…

या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिकच सोयीचा होणार असून प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. मुंबई ते उरण हा प्रवास यामुळे गतिमान होईल आणि पुढे हाच प्रकल्प चिर्ले ते पळस्पे फाट्यादरम्यान उन्नत मार्ग म्हणजे उड्डाणपूड उभारून मुंबई पुणे महामार्गाशी जोडला जाणार आहे. यासोबतच वरळी ते शिवडी अशी संलग्नता या प्रकल्पामुळे येणार आहे.

एकंदरीत या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे वरळी ते मुंबई पुणे महामार्ग हे अंतर जवळ होणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे वाहतुकीसाठी दाखल झाल्यानंतर वरळीहुन मुंबई पुणे महामार्ग मात्र एका तासात गाठता येणे शक्य होणार आहे. यासाठी मात्र आता ऑगस्टपर्यंतची वाट पहावी लागणार आहे.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 18 महिने थकीत महागाई भत्ताबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पहा….

हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या चारी टप्प्यांचे काम ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांतर्गत चार टप्प्यात काम होत आहे. यात पहिले तीन टप्पे हे बांधकामाशीसंदर्भित आहेत आणि शेवटचा आणि चौथा टप्पा सुविधांशी निगडित आहे.

प्रशासकीय इमारत, जीपीएसआधारित टोल बूथ, वाहतूक नियंत्रण व व्यवस्थापक कक्ष, सीसीटीव्ही, स्वयंचलित वाहतूक नियंत्रण, दिवे, विद्युतीकरण आदी कामे या चौथ्या टप्पा अंतर्गत होणार आहेत. ते पूर्ण होण्यास मात्र ऑगस्ट उजाडणार असल्याचे ‘एमएमआरडीए’ने कळवले आहे. एकंदरीत आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. 

हे पण वाचा :- ब्रेकिंग! ठाणे-कल्याण मेट्रो मार्ग प्रकल्पातील ‘या’ टप्प्यासाठी निविदा जारी; ‘या’ दिवशी सूरू होणार प्रकल्प्नाचं काम, महानगर आयुक्त यांची माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe