Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील चाकरमान्यांना लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. खरं पाहता, शहरात पुल दुर्घटनाच्या घटना लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून धोकादायक पूल दुरुस्तीचे तसेच पुनर्बांधणीचे कामे हाती घेण्यात आले आहेत.
लोअर परेल भागातील डीलाईल पुलदेखील धोकादायक बनला होता. या पार्श्वभूमीवर या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. दरम्यान आता या पुलाच्या कामाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….
वास्तविक या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशा परिस्थितीत या पुलाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल मे महिन्याच्या म्हणजे पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र यावेळी या पुलाचा फक्त एकच भाग सुरू होणार आहे. यानंतर मग संपूर्ण पूल 30 जून पर्यंत सुरू करण्याचा मानस आहे.
पालिकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी हा पूल 31 मे पर्यंत संपूर्ण बांधून तयार होईल अन वाहतुकीसाठी याला खुला केला जाईल असा दावा केला होता. पण आता या पुलाचे संपूर्ण बांधकाम होण्यासाठी जून महिना उजाडणार आहे. मात्र या पुलाचा एक भाग मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ‘इतकं’ मिळणार अनुदान; पहा पात्रता अन अर्ज करण्याची प्रोसेस
अशा परिस्थितीत लोअर परेल मधील संबंधित भागातील वाहतूक कोंडी बहुतांशी कमी होईल असा दावा होत आहे. हा पुल जेव्हा पूर्णपणे बांधून प्रवाशांसाठी खुला केला जाईल तेव्हा लोअर परेल, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड तसंच भायखळा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान यापुलाच्या बांधकामाच्या कामामुळे मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरातील नागरिकांना कामानिमित्त जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना यामुळे करावा लागत आहे. म्हणून हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला व्हावा अशी इच्छा नागरिकांची आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! विरार-अलिबाग कॉरिडोरबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय; आता ‘या’ महिन्यात सुरु होणार काम, पहा….