Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की राजधानी मुंबईत सध्या वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश आहे.
या कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत मुंबईमध्ये देशातील पहिला समुद्र खालील बोगदा तयार केला जात आहे. दरम्यान आता या अंडर सी वॉटर टनेल संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा देशातील पहिला-वहिला समुद्राखालील बोगदा या चालू वर्षातील नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! पंजाब डख यांनी ‘या’ जिल्ह्यात वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता, पहा….
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या बोगद्यामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या गिरगाव ते वरळी हा प्रवास करण्यासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो.
मात्र हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. निश्चितच यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. दरम्यान आता आपण या समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबईमधील चाकरमान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनबाबत रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता…..
कसा राहणार समुद्राखालील बोगदा
कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत मरीन ड्राईव्ह ते बांद्रा वरळी सीलिंक या टप्प्यात हा समुद्राखालचा बोगदा तयार केला जाणार आहे. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.
बोगद्याचा व्यास हा 12.19 मीटर असून तो समुद्रसपाटीपासून 17-20 मीटर खाली आहे. या बोगद्याचा एक किमीचा भाग समुद्राखाली आहे. मुंबईमध्ये समुद्राखाली तयार होणाऱ्या या बोगद्यात आतमध्ये क्रॉस पॅसेज असणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबईमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MMRDA मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा याविषयी सविस्तर
चार पादचाऱ्यांसाठी आणि दोन वाहनधारकांसाठी हे क्रॉस पॅसेज बनवले जाणार आहेत. तसेच प्रत्येक बोगद्यात 3.2 मीटरच्या तीन लेन देखील तयार करण्यात आल्या आहेत. म्हणजेच दोन बोगद्यामध्ये सहा लेन राहणार आहेत.
एकंदरीत कॉस्टल रोड प्रकल्पांतर्गत तयार होणारा हा बोगदा आता नोव्हेंबर महिन्यात पूर्णपणे बांधून तयार होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिकच गतिमान होण्यास मदत होईल यात तीळमात्र देखील शंका नाही.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर