Mumbai Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी स्वप्ननगरी मुंबईला एक नवा रेल्वे मार्ग मिळणार आहे. हा एक आंतरराष्ट्रीय रेल्वे मार्ग राहणार असून थेट दुबईपर्यंत जाणार आहे. यामुळे मुंबई ते दुबई हा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होऊ शकतो असा दावा होऊ लागला आहे.
मुंबई ते दुबई दरम्यान तयार होणारा हा रेल्वे मार्ग जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या शहरा दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. सध्या मुंबईहून दुबईला जायचे असेल तर विमानाने प्रवास करावा लागतो.

मुंबईहून दुबईला जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. मुंबईतील अनेक जण पिकनिक साठी तसेच बिझनेस साठी दुबईला जातात. यामुळे आता संयुक्त अरब अमिरातीने दुबई ते मुंबई दरम्यान रेल्वे मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला असून हा संपूर्ण रेल्वे मार्ग समुद्रा खालून राहणार आहे.
त्याची लांबी ही जवळपास दोन हजार किलोमीटर राहण्याची शक्यता आहे आणि याचमुळे हा जगातील सर्वाधिक लांबीचा समुद्र खालील रेल्वे मार्ग प्रकल्प म्हणून ओळखला जाईल असे बोलले जात आहे. मात्र अजून या प्रकल्पाचा प्रस्ताव हा विचाराधीन आहे.
या प्रस्तावावर अजून फायनल निर्णय झालेला नाही. पण, जर या प्रस्तावाला दोन्ही देशांकडून मान्यता मिळाली तर मुंबई ते दुबई हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण केला जाऊ शकतो. मुंबई ते दुबई मार्गावर हायस्पीड ट्रेन समुद्राखालून धावणार असून या हायस्पीड ट्रेनचा वेग ताशी 600 ते 1 हजार किलोमीटरपर्यंतचा असू शकतो.
दरम्यान भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला तर हा हायस्पीड रेल लिंक प्रकल्प 2030 पर्यंत प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तरच सध्या मुंबई ते दुबई असा विमान प्रवास करायचा असल्यास जवळपास सव्वा तीन तासांचा कालावधी लागतो.
मात्र या हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि दुबई या दोन शहरांमधील अंतराबाबत बोलायचं झालं तर या दोन्ही शहरांमध्ये हवाई अंतर 1928 किलोमीटर, रस्ते अंतर 6628 किलोमीटर आहे अन समुद्री अंतर 2179 किलोमीटर इतके आहे.
रस्ते मार्गाने मुंबई ते दुबई असा प्रवास जर करायचा निर्णय घेतला तर जवळपास साडेतीन दिवसांचा वेळ लागू शकतो. यामुळे मुंबई ते दुबई दरम्यान रेल्वे मार्ग प्रोजेक्ट पूर्ण झाल्यास या दोन्ही शहरादरम्यानची कनेक्टिव्हिटी फारच मजबूत होणार आहे.