Mumbai Railway News : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे आणि येत्या काही दिवसांनी आता उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की अनेक जण आपल्या मूळ गावाला परतणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी आपल्या नातलगांकडे जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असते.
याशिवाय अनेक जण उन्हाळी पर्यटनासाठी देखील घराबाहेर पडत असतात. हेच कारण आहे की देशभरातील रेल्वे गाड्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात गर्दी पाहायला मिळते.

दरम्यान आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर समर स्पेशल ट्रेन सुरू केल्या जात आहेत.
उन्हाळी गर्दीच्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते बेंगळुरूच्या सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस (SMVT) दरम्यान 13 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण मुंबई ते बेंगळूरु दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ? या संदर्भातही थोडक्यात आढावा घेणार आहोत.
कसं असणार समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक
मुंबई बेंगळूरु विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 01013) मुंबई येथील CSMT येथून 5 एप्रिल ते 28 जून 2025 या काळात चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी प्रत्येक शनिवारी रात्री 12:30 वाजता सीएसएमटी येथून रवाना होणार आहे व त्याच दिवशी रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी बेंगळुरू SMVT येथे पोहोचणार आहे.
तसेच, परतीच्या प्रवासासाठी बेंगळुरू SMVT – मुंबई सीएसएमटी विशेष ट्रेन (गाडी क्रमांक 01014) बेंगळुरू SMVT येथून 6 एप्रिल ते 29 जून 2025 दरम्यान सोडली जाणार आहे.
ही गाडी या काळात प्रत्येक रविवारी पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी बेंगलोर येथून सुटणार आहे व दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी ही गाडी मुंबई येथील सीएसएमटीवर पोहोचेल.
समर स्पेशल ट्रेन कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?
मुंबई येथील सीएसएमटी ते बेंगळूरु दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या समर स्पेशल ट्रेनला पुणे, मिरज, बेळगाव, हुबळी, दावणगेरे आणि तुमकुरू या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे. या समर स्पेशल ट्रेनमध्ये एकूण 22 डबे असणार. यात वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य श्रेणीचे डबे असतील.