मोठी बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाचे चार पदरीकरण केले जाणार, 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

Published on -

Nagar New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे राज्यात अजूनही काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तर येत्या काही दिवसांनी काही नव्या प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातही काही महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्त्याचे चार पदरीकरण केले जाणार असून या प्रकल्पाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे.

याशिवाय जिल्ह्यातील एका दुपदरी महामार्गाचे तीन पदरीकरण केले जाणार आहे आणि एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाचे सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान आता आपण या तीनही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

 या रस्त्याचे चार पदरीकरण केले जाणार 

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक – शिर्डी या रस्त्याचे चार पदरीकरण केले जाणार आहे. नांदूर शिंगोटे, निर्मळ पिंपरी – निमोण या 22 किलोमीटर लांबीचा रस्त्याचे चार पदरीकरण केले जाणार आहे.

यामुळे सिन्नर संगमनेर मार्गावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागातील नागरिकांना जलद गतीने शिर्डीत पोहोचता येईल अशी आशा आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे नाशिक सिन्नर मार्गे शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याची शक्यता आहे.

 या रस्त्याचे तीन पदरीकरण केले जाणार 

 नाशिक – शिर्डी रस्त्याचे चार पदरीकरण करण्यासोबतच जुना नाशिक रस्ता सुद्धा तीन पदरी बनवला जाणार आहे. जुना नाशिक रस्ता म्हणजेच लोणी ते कोल्हार दरम्यानचा 13 किलोमीटर लांबीचा दोन पदरी रस्ता आता तीन पदरी केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 75 कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यामुळे श्रीक्षेत्र नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्रांवर जाताना होणारी वाहतूक कोंडी दूर होईल अशी आशा आहे. या तीन पदरी प्रकल्पामुळे शिर्डी विमानतळावरून थेट नाशिकला जाणाऱ्या भाविकांची आणि नागरिकांची सोय होणार आहे. 

या रस्त्याचे सहापदरीकरण होणार 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे अहिल्यानगर महामार्गावरील नांदूर शिंगोटे ते कोल्हार या 47 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सहा पदरीकरण केले जाणार आहे.

या प्रकल्पासाठी देखील 326 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे श्रीक्षेत्र नासिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी दूर होईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News