Nagar Railway News : केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्रासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील एका महत्त्वाचा रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रातील सरकारकडून जवळपास 240 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण हा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका कसा आहे याच संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून घेणार आहोत.
कसा आहे नवा रेल्वे मार्ग प्रकल्प?
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा – शिर्डी रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या दुहेरीकरणासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे पुणतांबा ते शिर्डी दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. शिर्डी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.

येथे जगभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. दरम्यान याच साई भक्तांना आता रेल्वेने एक मोठी भेट दिली आहे. 239.80 कोटी रुपये खर्च असणाऱ्या पुणतांबा ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे.
महत्वाची बाब अशी की याबाबत मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने प्रसिद्ध पत्रक जारी करत पुणतांबा शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासं रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान हा दुहेरीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणतांबा ते शिर्डी दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील ताण कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या रेल्वे मार्गाचा शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना तसेच या मार्गावरील नियमित प्रवासी विद्यार्थी व्यापारी आणि शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे.
त्यामुळे हा दुहेरीकरणाचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी येथील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. नक्कीच केंद्रातील सरकारने घेतलेला हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला चालना देणारा राहणारा असून यामुळे लाखो साई भक्तांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
दुसरीकडे, नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प देखील शिर्डी मार्गे नेला जाणार आहे. यामुळे शिर्डीची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.
सध्या अहमदनगर, पुणतांबा, शिर्डीमार्गे पुणे–नाशिक नवीन जोडणाऱ्या मार्गासाठी अंतिम सर्वेक्षणाची कामे प्रगतीपथावर आहेत आणि या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर व्हावे या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.