Nagpur Goa Expressway : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग पाठोपाठ आता उपराजधानी नागपूरला अजून एक महामार्गाची भेट मिळणार आहे. आता नागपूर ते गोवा दरम्यान शक्तिपीठ महामार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या नागपूर गोवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्याचे कारण असं की हा महामार्ग महाराष्ट्रातील अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी देवस्थान वगळता सर्व शक्तीपीठांना जोडणार आहे.
निश्चितच यामुळे या महामार्गाची महती अजूनच वाढत आहे. दरम्यान या प्रस्तावित करण्यात आलेल्या महामार्गामुळे महाराष्ट्राचा एकात्मिक विकास साध्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला, आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राला, उद्योग जगताला मोठा फायदा होणार असल्याचे देखील सांगितले जाते.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्तविकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या पुढाकाराने तयार केला जाणार आहे. विशेष बाब अशी की, हा महामार्ग समृद्धी महामार्गाच्या तुलनेत अधिक लांब राहणार आहे. समृद्धी महामार्ग हा 720 किलोमीटर लांबीचा असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे नागपूर ते शिर्डी लोकार्पण झाले असून शिर्डी ते मुंबई हा टप्पा देखील या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. दरम्यान हा शक्तीपीठ महामार्ग 760 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
याच्या माध्यमातून राज्यातील 13 जिल्हे जोडले जाणार असून एकूण तीन शक्तिपीठ म्हणजे महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रा देवी रस्ते मार्गाने थेट जोडले जाणार आहेत. याशिवाय हा महामार्ग महाराष्ट्रातील इतर अन्य धार्मिक स्थळांना देखील जोडणार आहे. माहूर, औंढा नागनाथ,अंबाजोगाई, परळी, पंढरपूर नरसोबाची वाडी, कोल्हापूर हे प्रमुख धार्मिक स्थळ यामुळे रस्ते मार्गाने जोडले जातील.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला हा महामार्ग श्रीक्षेत्र माहूर या ठिकाणी महामार्ग क्रमांक 161 एला जोडला जाणार आहे. सध्या स्थितीला या महामार्गाच्या संपादनासाठी सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. श्रीक्षेत्र माहूर या ठिकाणी हा महामार्ग विकसित झाल्यानंतर सारखणी, मांडवी, पिंपळगाव, आदिलाबाद या आंतरराज्य रस्त्यांचे देखील यामुळे महत्त्व वाढेल असं सांगितलं जात आहे.
याशिवाय हा महामार्ग कन्याकुमारी ते काश्मीर म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ला जोडला जाणार असल्याने नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याला याचा फायदा होणार आहे. दरम्यान या महामार्गाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर 75 हजार कोटी रुपयांचा खर्च यासाठी केला जाणार आहे. दरम्यान, महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून प्रस्तावित राहणार आहे याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.