नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग ; भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम वाटपासाठी ‘या’ गावात 30 तारखेपर्यंत शिबिराचे आयोजन, शेतकऱ्यांना मिळणार ‘इतका’ मोबदला

Published on -

Nagpur Ratnagiri National Highway : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गचे सध्या काम सुरु आहे. हा उपराजधानी नागपूर आणि कोकणातील रत्नागिरी या दोन शहरांना जोडणारां महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. दरम्यान हा महामार्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित आहे.

जिल्ह्यातील शाहुवाडी पन्हाळा करवीर हातकणंगले अशा एकूण चार तालुक्यात हा नॅशनल हायवे जाणार आहे. सध्या यां महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जात असून बाधितांना मोबदला दिला जात आहे.

जिल्ह्यातील या संबंधित तालुक्यातील बाधित गावात संबंधित महामार्गाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. आंबा ते चौकाकपर्यंत भूसंपादनाचे अंतिम निवाडे पूर्ण झाले असून आता जमीनदारांना मोबदला मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

त्यामुळे हा मोबतला देण्यासाठी बाधित गावात 19 जानेवारीपासून शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान आज आपण 28 जानेवारीपासून म्हणजे आजपासून कोण कोणत्या गावात मार्गाच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शिबिरांच्या आयोजन केलेले आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शेतकरी बांधवांच्या जमिनी या महामार्गात गेलेल्या असतील त्या शेतकरी बांधवांनी जमिनीचा मोबदला घेण्यासाठी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सर्व महत्त्वाच्या कागदपत्रासहित हजर राहावे.

नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात असून आज 28 जानेवारी रोजी म्हणजे आज शनिवारी करुंगळे (शाहूवाडी), निळे (शाहूवाडी), वालूर (शाहूवाडी), वारुळ (शाहूवाडी) यां गावातील बाधितांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 

29 जानेवारी रोजी म्हणजे रविवारी चांदोली (शाहूवाडी), केर्ले (शाहूवाडी), चनवाड (शाहूवाडी) यां गावात राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला देण्यासाठी शिबिरांच्या आयोजन करण्यात आले आहे. 

30 जानेवारी रोजी म्हणजे सोमवारी आंबा (शाहूवाडी) व तळवडे (शाहूवाडी) या गावात नागपूर रत्नागिरी महामार्गात बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe