Namo Shetkari Yojana : अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेची घोषणा केली. ही योजना केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवण्याचे देखील त्यांनी सांगितले.
म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. अर्थातच पीएम किसान योजनेचे 6000 रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये राज्यातील पीएम किसान च्या पात्र लाभार्थ्यांना आता मिळणार आहेत.
दरम्यान आता राज्याच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता नेमका केव्हा शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार या संदर्भात ही एक मोठी अपडेट आहे. तत्पूर्वी आपण या योजनेसाठी राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत? तसेच यासाठी काय पात्रता आहेत? काय अटी आहेत? याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.
नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना
ही महाराष्ट्र राज्य शासनाची योजना आहे. याची घोषणा वर्तमान शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या राज्याच्या योजनेचा राज्यभरातील जवळपास 96 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी निकष हे पीएम किसान योजनेप्रमाणेच आहेत.
म्हणजेच जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र राहणार आहेत त्याच शेतकऱ्यांना राज्याच्या या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्थातच पीएम किसान च्या लाभार्थ्यांना आता बारा हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये केंद्राच्या योजनेचे 6000 आणि राज्याने नुकत्याच जाहीर केलेल्या या नमो शेतकरी चे सहा हजार रुपयाचा समावेश राहणार आहे.
कोणते शेतकरी राहणार अपात्र?
पीएम किसानसाठी जे शेतकरी अपात्र आहेत ते शेतकरी यासाठी देखील अपात्र राहणार आहेत.
म्हणजे आयकरदाते पण शेतकरी यासाठी अपात्र आहेत.
सरकारी नोकदार देखील या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत.
विधान परिषद, विधानसभा तसेच लोकसभा व इतर लोकप्रतिनिधी या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत.
योजनेचा लाभ कोणाला?
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अशा शेतकऱ्याला दिला जाणार आहे ज्या शेतकऱ्याच्या नावावर एक फेब्रुवारी 2019 पूर्वी शेतजमीन आहे.
एका आकडेवारीनुसार राज्यातील जवळपास 96 लाख शेतकऱ्यांच्या नावावर एक फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन आहे म्हणजे या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पण यापैकी जवळपास 12 लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंक बॅंक खाते आणि नावावरील सर्व मालमत्तांची माहिती दिलेली नाही. यामुळे पीएम किसानपासून हे 12 लाख शेतकरी ऑलरेडी वंचित आहेत आणि आता या राज्याच्या योजनेपासून देखील बारा लाख वंचित राहणार आहेत. म्हणजे राज्यातील 82 लाख शेतकऱ्यांना या पीएम किसानचा आणि राज्याच्या नमो शेतकरीचा फायदा होणार आहे.
केव्हा मिळणार पहिला हफ्ता
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने कृषी विभागाशी पत्रव्यवहार करून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव मागितला आहे. तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पोहोचला आहे. तर दुसरीकडे आता केंद्राने पीएम किसान चा लाभ देण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.
राज्यातील लाभार्थींची माहिती केंद्राने मागविली आहे. म्हणजे त्या काही दिवसात पीएम किसानचा चौदावा हप्ता मिळणार आहे. असं सांगितलं जात आहे की, पीएम किसानचा हा येणारां हफ्ता मेअखेरीस शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे राज्य सरकार देखील त्याचवेळी शेतकऱ्यांना आपला पहिला हप्ता देणार असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.