Nashik Pune Railway : नासिक आणि पुणे ही मध्य महाराष्ट्रातील दोन अति महत्त्वाची शहरे. नासिक एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते तर पुणे हे एक शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असून अलीकडे आयटी हब म्हणून संपूर्ण देशात विख्यात बनले आहे.
अशा परिस्थितीत या दोन्ही शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्यासाठी सेमी हाय स्पीड रेल्वे चा पर्याय पुढे आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे.
राज्यात सत्ता बदल झाला, शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले तेव्हापासून या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे पहावयास मिळत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘अस’ झालं तर तालुका कृषी अधिकारी राहणार जबाबदार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
आता सत्ता बदल होऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे अर्थातच येत्या काही दिवसात सत्ता बदल आला एक वर्ष पूर्ण होणार आहे. मात्र तरीही नासिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे ला जचालना मिळत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तसेच जमीनदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळतं आहे. वास्तविक या रेल्वे मार्गामुळे नासिक आणि पुणे या दोन शहरांदरम्यानचा प्रवास केवळ दोन तासात पूर्ण करता येणार आहे. म्हणून हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर या दोन्ही शहरातील नागरिकांच्या आशा चांगल्या उंचावल्या आहेत.
काय आहे प्रकल्पाची सद्यस्थिती?
गेल्या जून महिन्यात राज्यात सत्ता बदल झाला तेव्हापासून या प्रकल्पाला अपेक्षित अशी गती मिळालेली नाही. अशातच गेल्या महिन्यात महसूल विभागात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक जमीन भूसंपादनाचे काम कमालीचे मंदावले आहे.
नाशिक जिल्ह्यात नाशिक व सिन्नर तालुक्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी नासिक जिल्ह्यातील या दोन तालुक्यात 21 गावांमधील सुमारे 272 हेक्टर क्षेत्र अधिग्रहित केले जाणार आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स
विशेष म्हणजे यापैकी 50 हेक्टरच्या आसपास जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. पण आता शासन दरबारी या प्रकल्पासाठी आवश्यक ती पावले उचलली जात नाहीयेत. तसेच भूसंपादन अधिकारी पद रिक्त आहे.
यामुळे नासिक जिल्ह्यात या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाचे काम ठप्प आहे. याशिवाय प्रकल्पाची जबाबदारी असणार्या महारेलकडूनही कोणत्याच हालचाली होताना दिसून येत नाही. यामुळे आता या प्रकल्पाबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.