New Year Celebration: नवीन वर्षाचे स्वागतासाठी कशाला गोव्याला जायचे? भारतातील ‘हे’ बीच न्यू इयर पार्टीसाठी ठरतील महत्त्वाचे

Ajay Patil
Published:
beach for new year party

New Year Celebration:- वर्ष 2024 आता काही दिवसांवर येऊन ठेपले असून अनेकजण या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक असतील. आपल्यापैकी बरेच जण न्यू इयर पार्टी करिता अनेक प्रकारच्या प्लॅनिंग देखील करत असतात व  नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात व्हावे आणि जुन्या वर्षाला अलविदा म्हणतांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण हे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची प्लॅनिंग करतात.

यामध्ये प्रामुख्याने जर पाहिले तर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन करण्याची योजना आखतात. यामध्ये बरेच जण मोठ्या प्रमाणावर गोव्याला जाण्याचा प्लान करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर 31 डिसेंबरला गोव्यामध्ये गर्दीचा महापूर उसळतो.

देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येतात व त्यामुळे या ठिकाणाच्या आवडत्या बीचवर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पण तुम्हाला गर्दीत सेलिब्रेशन नको असेल व निवांतपणे न्यू इयर पार्टी सेलिब्रेट करायचे असेल तर भारतामध्ये गोव्याव्यतिरिक्त अशी अनेक बीच आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही अगदी उत्साहात आणि जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करू शकतात. याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.

 न्यू इयर पार्टीसाठी भारतातील महत्त्वाचे बीच

1- कोची या ठिकाणी तुम्ही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जाऊ शकतात व अगदी उत्साहामध्ये सेलिब्रेशन देखील करू शकतात. या ठिकाणी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोचीन कॉर्नीव्हलचे आयोजन केले जाते व यामध्ये अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

यामध्ये अनेक प्रकारचे संगीत, नृत्य तसेच खाद्य महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेतले जातात. बाईक रेस तसेच सायकल रेस व बीच फुटबॉल या सगळ्या गोष्टींची रेलचेल या फेस्टिवल मध्ये असते. या ठिकाणी बीच पाहिले तर फोर्ट कोची बीच, महात्मा गांधी बीच आणि चेराई बीच सेलिब्रेशन साठी महत्त्वाचे आहेत.

2- चेन्नई हे देखील न्यू इयर सेलिब्रेशन साठी एक भन्नाट डेस्टिनेशन असून या ठिकाणी न्यू इयरच्या पार्ट्या खूप खास पद्धतीने आयोजित केल्या जातात. या ठिकाणी असलेल्या मरीना बीचवर  संध्याकाळच्या वेळेला खूप वेगळ्याच प्रकारची मजा येते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्यरात्री येथे फटाक्यांमुळे समुद्रकिनाऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्राप्त होते व फटाक्यांमुळे हा समुद्रकिनारा संपूर्णपणे उजळून निघतो.

या ठिकाणी असलेल्या नाईट क्लबमध्ये तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत भरपूर मजा करू शकतात. या ठिकाणी जर आपण प्रमुख बीच पाहिले तर मरीना बीच, ब्रिझी बीच, व्ही.जी.पी गोल्डन बीच इत्यादींचा समावेश होतो.

3- कर्नाटक तसेच तुम्ही कर्नाटक आणि कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूरु या ठिकाणी देखील नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करू शकतात. या ठिकाणचे क्लब आणि लाऊंज देखील खास आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या कर्नाटकचे बीच आणि रिसॉर्ट या ठिकाणी देखील नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात.

विशेष म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमांची बुकिंग देखील काही महिन्यांपासून सुरू होते. या ठिकाणी गोकर्ण बीच, ओम बीच आणि कुडल बीच नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी खूप आकर्षक ठरतील असे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe