कितीही पैसा कमावला तरी घरात पैसा टिकत नाही? घरामध्ये लावा ‘हे’ रोपटे, घरामध्ये राहील पैशांची बरकत; वाचा काय म्हणते ज्योतिषशास्त्र?

बरेच जण नोकरी करत असतात किंवा एखादा व्यवसाय करत असतात व या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसा देखील कमवतात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की कितीही पैसा कमावला तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नाही. 

Published on -

Astro Tips:- बरेच जण नोकरी करत असतात किंवा एखादा व्यवसाय करत असतात व या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसा देखील कमवतात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की कितीही पैसा कमावला तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नाही.

ही समस्या प्रामुख्याने महिन्याला पगार कमावणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत जास्त करून दिसून येते. जेव्हा महिन्याला पगार खात्यात जमा होतो त्यानंतर तो अशाप्रकारे खर्च व्हायला लागतो की पुढच्या महिन्याची पगाराची तारीख येत नाही

तोपर्यंत पूर्ण बँक खाते रिकामे होते व त्यानंतरच्या कालावधीत जर पैसा लागला तर मात्र नातेवाईक किंवा मित्रांकडे हात पसरावा लागतो. तसेच बऱ्याच प्रमाणात काटकसर करून पैशांची बचत करण्याकडे देखील बऱ्याच जणांचा कल दिसून येतो. परंतु तरी देखील खर्च इतका असतो की तो अपरिहार्य ठरतो व केल्याशिवाय काही पर्याय देखील नसतो.

त्यामुळे मनात प्रश्न निर्माण होतो की सगळे करून देखील पैसा घरामध्ये टिकत का नाही किंवा त्याची बचत का होत नाही? या समस्येवर ज्योतिष शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आलेले आहेत त्यातील एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे जर तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणात पारिजातकाचे रोप लावले तर त्याचा सकारात्मक परिणाम याप्रकारे पैशांच्या समस्येवर दिसून येतो व आयुष्यावर देखील पडतो.

पारिजातकाचे फुल हे सगळ्यांना माहिती आहे व ते हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते. याबाबत ज्योतिष शास्त्र म्हणते की ज्या घरामध्ये पारिजातकाचे रोप असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. हे रोपटे योग्य दिशेला लावले तर अनेक प्रकारच्या अडचणी सुटण्यास मदत होते.

पारिजातकाचे रोप लावल्याने मिळतात अनेक फायदे

1- आर्थिक परिस्थिती सुधारण्यास होते मदत- असे म्हटले जाते की,पारिजातकाचे फुल हे लक्ष्मीला खूप प्रिय असून ज्या ठिकाणी या फुलाचा सुगंध असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मी ही वास्तव्य करते किंवा थांबून जाते.

त्यामुळे घरामध्ये जर पारिजातकाचे रोप ठेवले तर आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हायला मदत होते व चार पटीने प्रगती होऊ शकते. तसेच असे म्हटले जाते की घरातील लोकांचे मानसिक आरोग्य देखील उत्तम राहते व घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते.

2- नकारात्मक ऊर्जा नष्ट होते- घरामध्ये जर पारिजातकाचे रोप लावले तर घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायला मदत होते व या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे बरेच फायदे होतात.

तसेच घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला या रोपाची लागवड केली तर घरातील वास्तुदोष देखील नाहीसे होतात. पारिजातकाच्या फुलाला पाहिल्यानंतर देखील खूप शांतता येते व मनाला समाधान वाटते.

3- नोकरी व्यवसायात होतो फायदा- नोकरी किंवा व्यवसायामध्ये जर यश मिळत नसेल तर 21 पारिजातकाच्या फुलांना लाल कपड्यांमध्ये बांधून घरात लक्ष्मी देवीच्या समोर ठेवावे. असे म्हटले जाते की, यामुळे प्रगती होते व नोकरीत देखील चांगल्या संधी मिळतात.

4- अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जातून मिळू शकते मुक्ती- पारिजातकाचे रोप जर घरात लावले तर खूप मोठे फायदे होतात. जसे की तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला मिळण्यास मदत होते. तसेच तुमच्या डोक्यावर जर कर्ज असेल तर तुम्ही कर्जातून मुक्त देखील होऊ शकतात.

याकरिता पारिजातकाच्या रोपाचे एक तुकडं लाल कपड्यात बांधून लक्ष्मी देवीच्या समोर ठेवायला हवे व त्यानंतर विधिवत पद्धतीने देवी लक्ष्मी आणि रोपाच्या तुकड्याची पूजा करावी व या रोपाला हळद-कुंकू व्हावे. तसेच त्यानंतर कनकधारा स्त्रोताचे पठण करावे. हे केल्याने नक्कीच चांगला फायदा मिळतो असं ज्योतिषशास्त्र सांगते.

( टीप- वरील माहिती वाचकांकरिता फक्त माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा अथवा या माहितीचे समर्थन करत नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News