अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोरोनाच्या जागतिक महामारीचे केंद्रस्थान असलेल्या चीनमध्ये शनिवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे ब्राझीलमधील नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून
एक-दोन दिवसांत हा देश रशियाला मागे टाकून अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर जाईल, तर भारतातही नव्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता दोन दिवसांत इराणला मागे टाकून भारताचा कोरोनाग्रस्तांच्या यादीत टॉप १० देशांमध्ये समावेश होईल असे दिसते.
जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५३ लाख ३५ हजारांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज एक लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. बळींची संख्या ३ लाख ४१ हजारांवर गेली असून आतापर्यंत २२ लाख लोक बरे झाले आहेत.
उपचार सुरू असलेल्या २८ लाख २० हजार कोरोनाबाधितांपैकी अवघे ४५ हजार म्हणजे सुमारे २ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेसोळा लाखांवर गेला असून बळींचा आकडा १ लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज १५ ते १८ हजार नवे रुग्ण आढळत असल्याने या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३.३४ लाख झाली आहे. रशियात कोरोनाचे ३.३६ लाख रुग्ण असून या देशात दररोज सरासरी ९ हजार रुग्ण आढळत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com