Cheapest Jio Phone: आता कुणालाही घेता येईल फोन! जिओने आणले महिन्याच्या चहाच्या खर्चात घेता येतील असे फोन,वाचा माहिती

रिलायन्स जिओच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत जिओ भारत व्ही 3 आणि जिओ भारत व्ही 4 असे दोन मॉडेल लॉन्च केले.त्यामुळे आता बऱ्याच ग्राहकांना 4G नेटवर्कचा आनंद घेणे शक्य होणार आहे.

Published on -

Cheapest Jio Phone:- स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या जगामध्ये भारतात क्रांती घडवली असेल तर ती जिओने असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रिलायन्स जिओच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडतील असे रिचार्ज प्लान ते सर्वसामान्य नागरिकांना देखील फोन वापरणे परवडेल अशा किमतीतले फोन लॉन्च केलेले आहेत.

नुकतेच रिलायन्स जिओने आयएमसी म्हणजेच इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 च्या माध्यमातून अनेक प्रकारच्या घोषणा केल्या व त्यामध्ये कंपनीने 4G फोन सादर केले.

रिलायन्स जिओच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत जिओ भारत व्ही 3 आणि जिओ भारत व्ही 4 असे दोन मॉडेल लॉन्च केले.त्यामुळे आता बऱ्याच ग्राहकांना 4G नेटवर्कचा आनंद घेणे शक्य होणार आहे.

 हे आहेत जिओचे नवीन 4G फोन

1- जिओ भारत व्ही 3 आणि जिओ भारत व्ही 4- जिओच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत जिओ भारत व्ही तीन आणि जीओ भारत व्ही 4 हे फोन लॉन्च करण्यात आलेले असून हे फिचर फोन आहेत. जर आपण या दोन्ही फोनची किंमत पाहिली तर ती साधारणपणे १०९९ रुपये इतकी आहे.

परंतु किमतीच्या मानाने या दोन्ही फोनमध्ये आकर्षक अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. जिओच्या या फोनमध्ये 1000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे व त्यासोबतच 128 जीबी स्टोरेजला फोन सपोर्ट करतात. विशेष म्हणजे या फोनमध्ये 23 भारतीय भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे.

इतर सेवा जर बघितल्या तर यामध्ये विविध प्रकारच्या जिओ सेवांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ पे आणि जिओ चॅट इत्यादी जिओचे अनेक ॲप्स वापरता येणार आहेत.

2- जिओ भारत बी 2 फोनची वैशिष्ट्ये तुम्हाला जर जिओ भारत बी दोन हा फोन घ्यायचा असेल तर तो 1399 रुपयामध्ये  खरेदी करता येणार आहे.हा कीपॅड फोन असून यामध्ये 1.77 इंचाचा स्क्रीन देण्यात आला असून 128 जीबी पर्यंत क्षमतेच्या एसडी कार्डला सपोर्ट करते.

तसेच यामध्ये 1000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली असून यामध्ये तुम्हाला डिजिटल रियर कॅमेरा देखील मिळतो. तसेच जिओच्या सेवांपैकी जिओ सिनेमा, जिओ सावन आणि जिओ पे इत्यादी ॲप्स वापरता येणार आहेत. हा फोन 23 भाषांना सपोर्ट करतो.

3- जिओ भारत फोन जिओ भारत फोन म्हणजेच के एक कार्बोन हा ग्रेड-रेड, पांढरा लाल आणि काळा राखाडी अशा रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून याची किंमत 999 रुपये व किंमत 1999 पर्यंत आहे.

हा फोन 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. या फोनच्या वापरामुळे वापरकर्त्यांना क्रिस्टल क्लियर एचडी व्हाईस क्लॅरिटीचा आनंद घेता येऊ शकतो.

तसेच वापरकर्ते हे त्यांच्या आवडीच्या भाषेमध्ये लाईव्ह टीव्ही चॅनल देखील पाहू शकतात. जिओ सिनेमा तसेच जिओ सावन द्वारे चित्रपट पाहता येऊ शकतो. तसेच स्पोर्ट्स हायलाइट्स आणि म्युझिक लायब्ररी मध्ये प्रवेश करून संगीत ऐकण्याचा आनंद देखील घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!