ठाणे ते बोरिवली हे अंतर आता पूर्ण करता येईल फक्त 12 मिनिटात! असेल देशातील सर्वात लांब भुयारी मार्ग, वाचा वैशिष्ट्ये

Published on -

भारतात आणि महाराष्ट्रात अनेक मोठमोठी पायाभूत प्रकल्पांचे कामे सुरू असून यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प तसेच टनेल प्रोजेक्ट, मेट्रो प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम सध्या जोरात सुरू आहे. तसेच काही प्रकल्प हे प्रस्तावित असून लवकरच अशा प्रकल्पांची कामे देखील आता सुरू होणार आहेत.

यामध्ये रस्ते प्रकल्प आणि त्यावर उभारण्यात येणारे टनेल प्रोजेक्ट हे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार असून अशा मार्गांच्या किंवा अशा प्रकल्पांच्या मदतीने आता अनेक शहरांमधील अंतर कमालीचे कमी होणार आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण ठाणे ते बोरिवली या टनेल प्रोजेक्टच्या बाबत पाहिले तर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  भूमिपूजन पार पडले व त्यासोबतच त्यांनी या 16600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी देखील केली.

ठाणे ते बोरिवली या ट्वीन टनेल प्रोजेक्टचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी जो काही एक ते सव्वा तासाचा कालावधी लागत होता तो आता फक्त बारा मिनिटात पूर्ण करता येणार आहे.

 कसा आहे हा प्रकल्प?

हा एक महत्वपूर्ण ट्वीन टनेल म्हणजेच बोगदा असणारा असून तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. या बोगद्याचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण करण्यात यश मिळणार आहे.

या प्रकल्पाची लांबी 11.8 किलोमीटर असून त्यामुळे आता ठाणे ते बोरवली हा प्रवासामध्ये एक तासाची बचत होऊन एकूण अंतर बारा किलोमीटरने कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामध्ये 10.25 किलोमीटर लांबीचे बोगद्यांची उभारणी केली जाणार आहे व यामध्ये दोन मार्गीका असणारे जुळे बोगदे उभारले जाणार आहेत.

सध्या जर आपण बोरिवली ते ठाणे या दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा वेळ पाहिला तर तो दीड ते दोन तासांचा आहे. हा भुयारी मार्ग झाल्यानंतर हे अंतर बारा मिनिटात पूर्ण करता येणार आहे.

तसेच या बोगद्याचा काही भाग संरक्षित असलेल्या वनक्षेत्रातून जात असल्यामुळे या बोगद्याच्या खोदकामाकरिता कोणते तंत्रज्ञान वापरणे फायद्याचे होईल याकरता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स च्या साह्याने बोगद्याचे खोदकाम करण्याचे सुचवले आहे.

 ठाणे ते बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची वैशिष्ट्ये

1- हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा असणार आहे.

2- महत्वाचे म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता अबाधित ठेवणारा भुयारी मार्ग असणार आहे.

3- सिग्नल रहीत तसेच विना थांबा प्रवास करता येणार आहे.

4- यामुळे ठाणे ते बोरिवली दरम्यान एक तासापेक्षा अधिक वेळेची बचत होणार आहे.

5- जवळपास एक लाख प्रवाशांना याचा फायदा होईल.

6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनात दरवर्षी एक लाख 50 हजार मॅट्रिक टनांची घट होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe