शेतकऱ्यांना आता शेततळे खोदणे होईल सोपे! मिळणार दीड लाख रुपये अनुदान; वाचा संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात येत असून याकरिता अनेक योजनांची आखणी करण्यात येऊन त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. जेणेकरून अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत करून  शेतीला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मदत केली जाते.

जर आपण शेती उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर भरीव उत्पादनाकरिता पाण्याची आवश्यकता असते व त्यामुळे शेती करिता शाश्वत पाण्याच्या सोयी उपलब्ध असणे खूप गरजेचे असते. याकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून विहिरी असेच बोरवेल व गेल्या काही वर्षांपासून शेततळे उभारण्याच्या संख्येमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे.

यामध्ये शेततळे खोदण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शेततळे खोदण्याकरिता कमाल 75 हजार रुपये आणि अस्तरीकरणाकरिता कमाल 75 हजार असे एकूण दीड लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे.

 शेततळे खोदण्यासाठी मिळेल दीड लाखांचे अनुदान

शेतामध्ये शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध व्हावी याकरिता शेततळ्याला देखील आता खूप महत्त्व असून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे खोदण्याकरिता कमाल दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान देताना शेततळे खोदण्याकरिता जास्तीत जास्त 75000 व अस्तरीकरणासाठी जास्तीत जास्त 75000 असे म्हणून दीड लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळते.

विशेष म्हणजे हे अनुदान शेततळ्याचा आकारमानानुसार मिळत असते. शेतकरी बंधूंनी जर 15 बाय 15 चे शेततळे खोदण्याचा निर्णय घेतला तर त्यांना 18 हजार 621 रुपये अनुदान मिळते व या  शेततळ्याच्या  अस्तरीकरणाकरिता 28 हजार 245 रुपयांचे अनुदान मिळते.

शेतकरी बंधूंनी जर वीस बाय 15 चे शेततळे खोदायचा निर्णय घेतला तर याकरिता खोदकामासाठी 26674 रुपये अनुदान तर अस्तरीकरणाकरिता 31 हजार 598 रुपये अनुदान मिळते.

 या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कुठे करावा लागतो अर्ज?

वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे गरजेचे असते. हा अर्ज 23 रुपये 60 पैसे एवढ्या नाममात्र शुल्कात करता येणे शक्य आहे. यामध्ये एका वेळी ज्यांना जेवढ्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे

त्यासाठी अर्ज करता येऊ शकतो व जोपर्यंत लॉटरी पद्धतीने सदर योजने करता निवड होत नाही तोपर्यंत एकदा केलेला अर्ज हा ग्राह्य धरला जातो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे शेतकऱ्याला यामध्ये प्रत्येक योजने करिता स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज नसते व परत परत अर्ज देखील करावा लागत नाही.

 कुठली लागतात आवश्यक कागदपत्रे?

याकरिता वैयक्तिक शेततळ्याकरिता अर्ज करताना सातबारा तसेच आठ अ चा उतारा, आधार कार्ड तसेच बँक पासबुक, आम्ही पत्र अशा पद्धतीची कागदपत्रे लागतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक महिन्याला योजनेच्या लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते

व निवड झालेल्या शेतकऱ्यांना एका ठराविक मुदतीमध्ये कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करावी लागतात. समजा लॉटरीमध्ये नाव लागलेल्या शेतकऱ्याने जर कागदपत्र वेळेत अपलोड केलेले नाही तर वेटिंग लिस्ट मधील लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जातो.

 या योजनेच्या अधिक माहितीसाठी कुठे संपर्क कराल?

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विभाग कार्यालय किंवा कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe