महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा कव्हर; कुठली लागतील कागदपत्रे? वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
health insurance

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांकरिता अनेक प्रकारच्या योजनांची घोषणा करण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळेल असे चित्र दिसून येत आहे. आपण पाहिले की नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिला वर्गापासून ते शेतकऱ्यांपर्यंत, मुलींच्या शिक्षणापासून ते मुलांच्या शिक्षणाकरिता अनेक प्रकारच्या घोषणा करण्यात आलेले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी देखील या माध्यमातून राज्यातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. अगदी याच प्रकारे आता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी असून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विम्याचा मोफत फायदा घेता येणार आहे.

 महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या वतीने आता इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली असून या माध्यमातून आरोग्य विम्याचा फायदा नागरिकांना घेता येणार आहे. याबाबत सरकारकडून निर्णय देण्यात आल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या विमा योजनेमुळे राज्यातील जनतेला खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार असून या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत साधारणपणे एक लाख 50 हजार रुपयांचा विमा मिळत होता.

परंतु ही विम्याची सवलत ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा नागरिकांना उपलब्ध होता. त्यामुळे राज्यातील अनेक नागरिक या सुविधेपासून वंचित होते. आता राज्य सरकारच्या माध्यमातून या विमा योजने करिता उत्पन्नाची मर्यादा नसणार आहे व त्यामुळे सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 कसे असणार या योजनेचे स्वरूप?

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार संबंधित विमा कंपनीला प्रत्येक कुटुंबाकरिता तेराशे रुपयांचा प्रिमियम भरणार आहे व याकरिता सरकारी तिजोरीवर तब्बल 3000 कोटींचा भार पडणार आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील नऊशे रुग्णालय नवीन जोडली जाणार असून एकूण 1900 हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार देतील.

साधारणपणे मागच्या वर्षी जून महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विम्याची रक्कम दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप पर्यंत या घोषणेची अंमलबजावणी मात्र करण्यात आलेली नव्हती.

या योजनेकरिता सरकारकडून आता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून मिळत असलेल्या दीड लाखांचा विमा 30 जून पर्यंत होता व आता एक जुलैपासून  नागरिकांसाठी पाच लाख रुपयांचा विमा लागू करण्यात आला आहे.

 या दोनपैकी लागेल एक कागदपत्र

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या पाच लाख रुपये विम्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. या दोन्ही कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे. नाहीतर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe