आता फक्त ‘हे’ ॲप डाऊनलोड करा आणि रेशन दुकानातून धान्य घ्या! नाही लागणार रेशन कार्ड

Ajay Patil
Published:
ration card

Ration 2.0 App:- आपल्याला जर स्वस्त धान्य दुकानातून रेशन म्हणजेच धान्य घ्यायचे असेल तर त्याकरिता रेशनकार्ड आवश्यक असते. या व्यतिरिक्त रेशन कार्डच्या माध्यमातून आपल्याला अनेक सुविधा देखील मिळत असतात. भारतामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत देशातील पात्र असलेल्या व्यक्तींना रेशन कार्ड दिले जाते व तुम्ही जेव्हा रेशन दुकानांमध्ये धान्य घेण्यासाठी जातात तेव्हा बऱ्याचदा आपल्याला रेशन कार्ड दाखवावे लागते.

परंतु आता तुम्हाला जर रेशन दुकानातून धान्य घ्यायचे असेल तर रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये राशन 2.0( मेरा राशन 2.0) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करून त्याचा वापर करून स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळवू शकतात.

भारत सरकारच्या माध्यमातून हे ॲप्लीकेशन लॉन्च करण्यात आले आहे व त्यामुळे आता रेशन कार्ड नसताना देखील रेशन मिळणे शक्य होणार आहे.या एप्लीकेशन मध्ये फक्त आधार क्रमांक टाकून ऑनलाईन रेशन घेता येऊ शकते.

कसा करावा या एप्लीकेशनचा वापर?
सर्वप्रथम हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर युजर्सला त्याचा आधार कार्ड क्रमांक त्यामध्ये नमूद करावा लागेल

व त्यानंतर ओटीपी सह लॉगिन करावे लागेल. एकदा का तुम्ही लॉगिन केले तर तुमचे रेशन कार्ड या ॲपवर दिसते व या ॲपच्या माध्यमातून असलेले रेशन कार्ड तुम्ही दाखवून रेशन घेऊ शकतात.

रेशन मिळण्यासाठी आहेत हे नियम
भारत सरकारने या संदर्भात बरेच काही नियम केले आहेत व या नियमांच्या चौकटीत राहूनच लोकांना रेशनचा लाभ मिळत असतो. एखाद्या व्यक्तीकडे जर शंभर चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन असेल व ज्यामध्ये प्लॉट, फ्लॅट आणि घर असेल तर ते रेशनसाठी अर्ज करू शकत नाहीत.

तसेच कार आणि ट्रॅक्टर सारखी चार चाकी वाहन असेल तरी देखील व्यक्ती रेशन कार्ड करिता अपात्र ठरते.घरामध्ये जर फ्रिज किंवा एसी असेल तरी देखील रेशनचा लाभ मिळत नाही. कुटुंबातील कुठलाही सदस्य जर सरकारी नोकरी करत असेल तरी देखील रेशन मिळणार नाही.

रेशनचा लाभ मिळवण्यासाठी किंवा रेशन कार्ड मिळवण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे व शहरी भागांमध्ये ते तीन लाखपेक्षा जास्त नसावे.

जर कोणी आयकर भरत असेल तरी देखील त्यांना रेशन मिळू शकत नाही. एखाद्या व्यक्तीकडे जर लायसन्स असलेले शस्त्र असेल तरी देखील ते रेशनसाठी अपात्र ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe