Old Pension Scheme News : सध्या महाराष्ट्रात संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. नवीन पेन्शन योजना रद्दबातल करत जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS कर्मचाऱ्यांना बहाल करा अशी मागणी जोर धरत आहे. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एकीकडे ओ पी एस योजनेवरून संपूर्ण देशात रणकंदन सुरू असताना केंद्र शासनाने काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याची संधी या ठिकाणी दिली आहे.
यामुळे शासनाच्या या निर्णयावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयाचं तोंडभरून कौतुक देखील केला जात आहे. सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने याबाबत आदेश काढला आहे. या अनुसार 22 डिसेंबर 2003 पूर्वी विज्ञापित किंवा अधिसूचित पदांखाली केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय मिळणार आहे.
संबंधित सरकारी कर्मचारी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत हा पर्याय वापरू शकणार आहेत. दिलेल्या मुदतीत जर संबंधित कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना निवडली नाही तर अशा कर्मचाऱ्यांना बाय डिफॉल्ट नवीन पेन्शन योजनेअंतर्गत सुरक्षा कवच प्रदान केल जाणार आहे. पण या संबंधित कर्मचाऱ्यांनी एकदा ओ पी एस किंवा एनपीएस हा पर्याय निवडला तर त्यांना नंतर पर्याय बदलता येणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
केंद्र शासनाच्या या निर्णयावर नॅशनल मूवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम या संस्थेने आनंद व्यक्त केला आहे. सोबतच या संस्थेने नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याची विनंती यावेळी केली असून केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणी यावेळी केली आहे. दरम्यान जुनी पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रात मोठे राजकारण तापल आहे.
राज्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका यावेळी घेतली आहे. ओ पी एस लागू करा अन्यथा मत देणार नाही असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे राज्यातील 17 लाख कर्मचारी 14 मार्च रोजी ओ पी एस लागू करा या आपल्या मुख्य मागणीसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे आता या संपाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.