Onion News : राज्यात सध्या कांद्याच्या बाजारभावावरून राजकीय वातावरण तापलेल आहे. विपक्ष कडून सत्ता पक्षाने आखलेलं धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत यामुळेच कांद्याला कमी दर मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान तज्ञ लोक देखील कांदा निर्यात बंदी असल्याने सध्या देशांतर्गत कांद्याला कमी दर मिळत असल्याचा दावा करत आहेत. बाजारात कांदा मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो इतक्या कवडीमोल दरावर विक्री होत आहे.
या दरात कांदा विक्री केला तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतुकीसाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला 10 पोती कांदा विक्री केल्यानंतर मात्र दोन रुपयाचा चेक व्यापाऱ्याकडून देण्यात आला होता.
यामुळे या घटनेवर शेतकऱ्यांसहितच शेतकरी संघटना अन राजकारण्यांनी देखील मोठा संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे सोशल मीडियामध्ये आणि माध्यमांमध्ये देखील हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणाची राज्यभर चर्चा रंगली आणि शेतकऱ्यांपुढील असलेलं संकट पुन्हा एकदा जगासमोर आल. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये वेगाने व्हायरल झालेल्या या घटनेची निंदा करण्यात आली. अशातच या घटनेवर सोलापूर बाजार समिती ॲक्शन मोडमध्ये आहे.
व्यापाऱ्याने मात्र दोन रुपयाचा संबंधित शेतकऱ्याला चेक दिल्याने सोलापूर एपीएमसीची देखील मोठी किरकुरीत झाली. यामुळे एपीएमसीला ॲक्शन घेणे भाग होते. अशा परिस्थितीत सोलापूर एपीएमसी कडून संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर एपीएमसी ने या व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार या व्यापाऱ्याचा परवाना एपीएमसी कडून 15 दिवस निलंबित करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील मौजे बोरगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 17 फेब्रुवारी रोजी सोलापूर एपीएमसी मध्ये दहा पोती कांदा विक्रीसाठी नेला.
या कांद्याचे एकूण वजन 512 किलो म्हणजेच पाच क्विंटल 12 किलो इतकं भरलं. शंभर रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव या कांद्याला मिळाला. मात्र हमाली तोलाई मोटार भाडे इत्यादी खर्च वजा करता दोन रुपये 49 पैसे इतके शिल्लक पैसे उरले. या ठिकाणी विशेष बाब अशी की सोन्यासारख्याच आहे तुम्हाला लाकवडीमोल दर त्यातल्या त्यात दोन रुपये 49 पैशांचा या शेतकऱ्याला चेक देण्यात आला. जखमेवर मीठ चोळायचं म्हणून या चेकवर पंधरा दिवसांची तारीख देण्यात आली. म्हणजेच विक्रीनंतर हा चेक पंधरा दिवसांनी वटवला जाऊ शकतो.
यामुळे या घटनेवर सोशल मीडिया तसेच माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त झाला. बाजार समिती प्रशासनाकडे देखील ही बाब पोहचली. यावर प्रशासनाने संबंधित व्यापाऱ्याकडून स्पष्टीकरण मागितले. व्यापाऱ्याने मात्र समाधानकारक असं काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने या व्यापाऱ्याचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित केला. परवाना निलंबित झाला मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे काही सुटणार नाहीत. अजूनही कांद्याला बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे लाल कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पदरमोड करून पिकासाठी आलेला खर्च भगवावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.