यंदा उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होणार का? काय राहणार भविष्यातली परिस्थिती, वाचा…

Ajay Patil
Published:
Onion Price

Onion Price : खरीप 2022 हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी सिद्ध झाला. गेल्या हंगामातील लाल कांदा खूपच कवडीमोल दरात विक्री झाला आहे. लाल कांदा मात्र पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दरात विकावा लागला आहे. काही ठिकाणी तर याहीपेक्षा कमी दर लाल कांद्याला मिळाला.

अगदी एक ते दोन रुपये प्रति किलो या भावात देखील कांदा विकला गेला आहे. म्हणजेच रद्दीपेक्षा कमी दरात कांद्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली आहे. यामुळे कांदा उत्पादक चांगल्याच आर्थिक संकटात सापडला आहे.

दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कांदा अनुदान योजना आणली आहे. या अंतर्गत एक फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 पर्यंत विक्री झालेला लेट खरीप हंगामातील लाल कांदा अनुदानास पात्र ठरणार आहे. या कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादित मिळणार आहे.

हे पण वाचा :- सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….

पण खरीप हंगामात झालेली नुकसान भरपाई रब्बी हंगामातील कांद्यातून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र सध्या रब्बी हंगामातील कांदा देखील अपेक्षित अशा भावात विक्री होत नाहीये. उन्हाळी कांदाही लाल कांद्यासारखाच शेतकऱ्यांचा वांदा करत आहे.

खरं पाहता, मार्च आणि एप्रिल महिन्यात तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. काही भागात गारपीट झाली. कांदा उत्पादक जिल्ह्यातच गारपीटीचे प्रमाण अधिक होते.

यामुळे उन्हाळी हंगामातील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला असून जो कांदा शेतकऱ्यांच्या हाती आला आहे त्याची टिकवणक्षमता कमी झाली आहे. यामुळे असा कांदा साठवून ठेवता येणार नाही परिणामी बाजारात कांद्याची आवक वाढली आहे.

हे पण वाचा :- कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….

म्हणून आवकेचा दबाव दरावर येत असून सध्या कमी गुणवत्तेचा कांदा 600 ते 700 रुपये आणि चांगल्या गुणवत्तेचा कांदा 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दरात विक्री होत आहे. मात्र आता ही परिस्थिती ऑगस्ट महिन्यापासून बदलण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट मध्ये कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे तर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात बाजारात मागणीप्रमाणे कांद्याचा पुरवठा होणार नसून टंचाई निर्माण होणार आहे. शेतकरी आणि काही बाजार अभ्यासकांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात केवळ 30 टक्के कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहणाऱ असल्याचा अंदाज बांधला आहे.

यामुळे या तीन महिन्यांच्या काळामध्ये उन्हाळी हंगामातील कांदा दर सुधारण्याची शक्यता राहणार आहे. मात्र दर किती वाढणार? याबाबत जाणकार लोकांनी कोणताच अंदाज बांधलेला नाही. परंतु दरात सुधारणा होऊ शकते असं सांगितलं जात आहे. यामुळे आता दरात किती वाढ होईल हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. 

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ नवविवाहित जोडप्यांना मिळणार 50 हजाराचं प्रोत्साहन अनुदान ! पण…..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe