कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सर्वोत्कृष्ट कापूस वाणाची लागवड करा, 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming Maharashtra : राज्यात सर्वत्र कापूस पीक पेरणीसाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विदर्भातील काही भागात तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी कापसाची पेरणी देखील उरकून घेतले आहे.

मराठवाडा आणि खान्देश या कॉटन बेल्ट म्हणून विख्यात असलेल्या विभागात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरंतर कापूस हे एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही.

यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. जर कापसाला दहा हजारापर्यंतचा दर मिळाला असता तर कदाचित शेतकऱ्यांना कापूस पिकातून चांगली कमाई झाली असती.

परंतु कापसाचे दर सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले असल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. मात्र दरामुळे होणारी शेतकऱ्यांची ही कोंडी अधिक उत्पादनातून भरून काढली जाऊ शकते.

यामुळे शेतकऱ्यांनी यंदा अधिक उत्पादन देणाऱ्या कापसाच्या वाणाची लागवड करावी असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण राज्यात कापसाच्या लोकप्रिय जाती कोणत्या आहेत आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आहेत या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….

कापसाच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे

जंगी :- महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या प्रमुख कापूस जातींमध्ये या जातीचा समावेश केला जातो. हे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय वाण आहे. या जातीची कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये लागवड केली जाऊ शकते. ही जात पेरणी केल्यानंतर साधारणतः 150 ते 160 दिवसात काढणी करण्यासाठी तयार होत असते. या जातीला अधिक फवारणी करावी लागत नाही तसेच बोंडे अधिक लागतात शिवाय बोंडाचे वजन देखील चांगले समाधानकारक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जातीचा कापूस वेचणीसाठी सोपा राहतो यामुळे वेचणीवर अधिक मजुरी शेतकऱ्यांना खर्च करावी लागत नाही.

राशी RCH 659 :- कापसाचे ही जात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात उत्पादित केली जाणारी एक प्रमुख जात आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये शेती केली जाऊ शकते. ही जात लागवड केल्यानंतर साधारणतः 145 ते 150 दिवसात उत्पादन देण्यास तयार होत असते. अर्थातच जंगी या जातीपेक्षा ही जात लवकर तयार होते. विशेष म्हणजे या जातीपासून जवळपास 14 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असते. तसेच या जातीचा कापूस हा वेचणीसाठी सोपा राहतो.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ नवविवाहित जोडप्यांना मिळणार 50 हजाराचं प्रोत्साहन अनुदान ! पण…..

मनी मेकर :- कापूस उत्पादक शेतकरी बांधव या जातीची मोठ्या प्रमाणात शेती करतात. या जातीची लागवड बागायती आणि कोरडवाहू भागात केली जाऊ शकते. लागवड केल्यानंतर साधारणता दीडशे ते 160 दिवसात पीक काढण्यासाठी तयार होते. यापासूनही चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.

धनदेव प्लस :- कापसाची ही एक प्रमुख जात असून लवकर तयार होणाऱ्या वाणामध्ये या जातीचा समावेश केला जातो. ही जात साधारणता 130 ते 150 दिवसात काढणीसाठी तयार होत असते. म्हणजेच या जातीचे पीक लवकर परिपक्व होते आणि शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळते. लवकर काढण्यासाठी तयार होत असल्याने या जातीवर कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. ही जात कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये उत्पादित केली जाऊ शकते. या जातीच्या कापूस पिकाला फारशी फवारणीची गरज भासत नाही. सर्वसामान्य जाती उत्पादित करण्यासाठी शेतकरी बांधव जवळपास सहा फवारण्या करतात मात्र या जातीचा कापूस उत्पादित करण्यासाठी तीन ते चार फवारण्या पुरेषा होतात. विशेष बाब म्हणजे या जातीचा कापूस वेचणीसाठी सोपा राहतो आणि यातून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.

प्रदीप :- ही देखील कापसाची एक सुधारित जात असून या जातीचे पीक उंच वाढते. बागायती आणि कोरडवाहू भागात प्रदीप जातीचे कापूस पीक उत्पादित केले जाऊ शकते. विशेष म्हणजे 150 ते 160 दिवसात या जातीचा कापूस तयार होतो. यापासूनही शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. या जातीचा कापूस देखील इतर वाणाप्रमाणेच वेचणीसाठी सोपा राहतो.

हे पण वाचा :- सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….