भारताला १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स डिजिटल मालमत्ता संपादित करण्याची संधी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- भारतामध्ये २०३२ पर्यंत आपल्या जीडीपीमध्ये १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची आर्थिक वाढ करण्याची क्षमता असल्याचे क्रॉसटॉवर या जगातील गतीशील व आघाडीच्या क्रिप्टो व डिजिटल मालमत्ता एक्‍सचेंज कंपनीने यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरम (यूएसआयएसपीएफ) सोबत सहयोगाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

‘भारताला १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स डिजिटल मालमत्ता संपादित करण्याची संधी’ यावरील त्यांचा संशोधनात्मक अहवाल सादर केला. हा अहवाल भारत वेब ३.० चा अवलंब करत कशाप्रकारे डिजिटल मालमत्ता संधीचा लाभ घेऊ शकतो आणि भारताच्या आर्थिक परिसंस्थेच्या डिजिटायझेशनसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान का पुरेसे आहे या बाबींना निदर्शनास आणतो.

२०१३ मध्ये डिजिटल मालमत्ता बाजारपेठेचे भांडवल अंदाजे १.५ बिलियन अमेरिकन डॉलर्स होते. क्रॉसटॉवरचा अहवाल निदर्शनास आणतो की, आज बाजारपेठ भांडवल जवळपास ३.० ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.

तसेच अहवाल हे देखील निदर्शनास आणतो की, पुढील ११ वर्षांमध्ये एकूण आर्थिक विकासामधील भारताच्या १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे ध्येय अधिककरून सहाय्यक डिजिटल मालमत्ता- संबंधित व्यवसायांकडून साध्य होऊ शकते, जे अजून कार्यरत झालेले नाहीत.

संशोधन अहवालामधील काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: डिजिटल मालमत्ता अवलंबेचे प्रमाण (केंद्रीयकृत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसवर उघडलेल्या खात्यांमधून प्रतिबिंबित) इंटरनेटपेक्षाही दुप्पट गतीने वाढत आहे. इंटरनेटला जवळपास १०० दशलक्ष युजर्सवरून एक बिलियन युजर्सचा टप्पा गाठण्यामध्ये अंदाजे साडे सात वर्षे लागली. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसमध्ये याच वाढीला जवळपास चार वर्षे लागतील.

या ११ वर्षांच्या कालावधीमध्ये वेब ३.० भारतासाठी १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आर्थिक वाढीला चालना देऊ शकते. पण त्यासाठी योग्य धोरणे व नियामक आराखड्याची गरज आहे.

जागतिक आर्थिक सेवा बाजारपेठ २०२१ मध्ये २२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक असण्याचा अंदाज आहे आणि २०२५ पर्यंत २८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिकपर्यंत वाढेल. डिजिटल आर्टपासून तिकिट विक्री, संगीत,

संग्रहणीय, लक्झरी वस्तू व गेमिंगपर्यंत नॉन-फंगिबल टोकन्स (एनएफटी) लोकांच्या दैनंदिन जीवनातील संवादाच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात. नवीन असले तरी एनएफटी १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक मूल्य असलेल्या बाजारपेठेमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे.

यूएसआयएसपीएफचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश अघी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी बांधील राहत भारत २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहे. डिजिटल मालमत्तांच्या गतीशील अवलंबतेमुळे देशामध्ये पुढील ११ वर्षांत त्यामध्ये प्रचंड क्षमता असण्याची अपेक्षा आहे. ते भारताला ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स अर्थव्यवस्था संपादित करण्यामध्ये साह्य करण्याची अपेक्षा आहे.”

क्रॉसटॉवरचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल राठी म्हणाले, “डेटा निदर्शनास आणतो की, भारतीय नागरिक आपसूकच दूरदर्शी आहेत आणि वेब ३.० च्या माध्यमातून भारताला डिजिटल मालमत्ता व वेब ३.० मध्ये जागतिक अग्रणी असण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमी तरूण या आपल्या मुलभूत संसाधनांचा लाभ घेण्याची संधी आहे. योग्य धोरणे व नियामक आराखड्यासह भारताचे नियामक भारतामध्ये सुरक्षिततेसह आशा व समृद्धता आणू शकतात.”

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये योगदान देण्याची आणि परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता:

शासकीय प्रकल्प: शासनाशी संबंधित ब्लॉकचेन प्रकल्प २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये ०.१ बिलियन अमेरिकन डॉलर्सची भर करण्याला, तसेच २०३२ पर्यंत ५.१ बियिलन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे.

डिजिटल ओळख: अहवालातून निदर्शनास येते की, डिजिटल ओळख २०३२ पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये ८.५ बिलियन अमेरिकन डॉलर्सचे योगदान देऊ शकते.

पेमेण्ट्स व रेमिटन्सेस: अहवालातून निदर्शनास येते की, हा विभाग २०३२ पर्यंतच्या भारताच्या जीडीपीमध्ये जवळपास २१.७ बिलियन डॉलर्सचे योगदान देईल, जेथे ब्लॉकचेन पेमेण्ट्ससाठी कार्यक्षमतांना चालना देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe