OYO चा फुल फॉर्म काय आहे ? OYO नाव ठेवण्यामागची रंजक कहानी जाणून घ्या

OYO हे एक भारतातील प्रसिद्ध हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. ओयो रूम्स मध्ये तुम्हीही कधी ना कधी स्टे केला असेल. ओयो रूम्स कपल, फॅमिली तसेच सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांसाठी फारच उपयोगाची ठरत आहे. दरम्यान आज आपण याच OYO बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

OYO Full Form : तुम्हीही सोलो ट्रॅव्हलिंग करता का? किंवा सातत्याने कामानिमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते का? मग तुम्हीही कधी ना कधी ओयोच्या रूम मध्ये स्टे केला असेल. खरेतर, जेव्हा-केव्हा स्वस्त आणि चांगल्या हॉटेल्सची चर्चा होते तेव्हा लोकांच्या ओठांवर आपसूक नाव येत ते म्हणजे OYO रूम्सचे.

पण तुम्हाला OYO चा फुल फॉर्म माहिती आहे का ? नाही ना मग आज आपण याबाबत माहिती पाहणार आहोत. OYO हे नाव का ठेवण्यात आले आहे, यामागे नेमकी कहाणी काय आहे ? या संदर्भातील आज आपण डिटेल माहिती जाणून घेऊयात.

OYO चा फुल फॉर्म काय आहे?

OYO बाबत बोलायचं झालं तर ओयो रूमची स्थापना 2013 मध्ये झाली. भारतीय उद्योजक रितेश अग्रवाल यांनी या व्यवसायाची स्थापना केली. अग्रवाल यांना भारतात लाखो प्रवासी असे आहेत ज्यांना परवडणारे, सुरक्षित आणि स्वच्छ निवासस्थान हवे आहे परंतु त्यांना ते मिळत नाही, याची कल्पना होती.

दरम्यान हीच गोष्ट विचारात घेऊन रितेश अग्रवाल यांच्याकडून OYO चा म्हणजे “ऑन युवर ओन रूम्स” चा पाया घातला गेला. ओयोचा उद्देश असा होता की कोणतीही व्यक्ती कोणत्याही एजंटशिवाय स्वतःहून (On Your Own) हॉटेल शोधू शकते, बुक करू शकते आणि आरामात राहू शकते.

अर्थातच OYO चा फुल फॉर्म आहे On Your Own, म्हणजेच स्वतःच्या ताकदीवर. खरेतर, ओयो हे फक्त एक ब्रँड नेम नाही तर एक अशी कल्पना आहे जी आज लाखो प्रवाशांचे आणि हॉटेल मालकांचे जीवन सोपे करतांना दिसत आहे.

OYO च्या विशेषता काय आहेत?

जसं की आपणास ठाऊकच आहे की ओयो हे एक हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. पण प्रत्यक्षात तसे नाही ओयो केवळ हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म नाही तर ते हॉटेल मालकांना तांत्रिक सहाय्य, ब्रँडिंग, कर्मचारी प्रशिक्षण आणि बुकिंग व्यवस्थापन यासारख्या सुविधा देखील प्रदान करते. म्हणजेच ओयो हॉटेल मालकांचे सहकारी देखील आहे.

त्याच्या मदतीने, लहान हॉटेल्स देखील एका मोठ्या नेटवर्कचा भाग बनत आहेत, यामुळे छोट्या हॉटेलचा व्यवसाय सुद्धा झपाट्याने वाढला आहे. ओयो आता केवळ भारतातच नाही तर दुबई, मलेशिया, इंडोनेशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये देखील पाहायला मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe