तुमचे पॅन कार्ड बंद तर नाही ना? एका क्लिकमध्ये तपासा पॅनची स्थिती; अन्यथा बसू शकतो मोठा दंड

Published on -

Pan Card News : पॅन कार्ड (PAN Card) हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आर्थिक ओळखपत्र आहे. बँक खाते उघडणे, आयकर विवरणपत्र (ITR) भरणे, मोठे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, कर्ज घेणे अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.

मात्र, अनेक नागरिकांना त्यांच्या पॅन कार्डची सद्यस्थिती माहिती नसते. कारण आधार, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणे पॅन कार्डचा रोजच्या वापरात फारसा समावेश नसतो.

काही वेळा तांत्रिक कारणांमुळे, चुकीची माहिती, डुप्लिकेट पॅन, आधारशी लिंक न केलेले पॅन किंवा आयकर विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय (Inactive) किंवा अवैध (Invalid) ठरवले जाऊ शकते.

अशा परिस्थितीत जर नागरिकांनी निष्क्रिय पॅन वापरला, तर त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. बँक खाते गोठवले जाणे, आर्थिक व्यवहार अडचणीत येणे, मोठा दंड किंवा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणूनच, वेळोवेळी आपल्या पॅन कार्डची स्थिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. दिलासादायक बाब म्हणजे, यासाठी कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर केवळ काही सोप्या स्टेप्समध्ये पॅन कार्डची स्थिती तपासता येते.

पॅन कार्डची स्थिती कशी तपासावी?

1- आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट उघडा.

2- होमपेजवर दिलेल्या ‘Verify Your PAN’ (व्हेरिफाय युवर पॅन) या पर्यायावर क्लिक करा.

3- येथे पॅन नंबर, पूर्ण नाव, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर अशी आवश्यक माहिती भरा.

4- दिलेल्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) प्रविष्ट करा.

5- प्रक्रिया पूर्ण होताच, स्क्रीनवर तुमचा पॅन Active, Inactive किंवा Invalid आहे की नाही, याची माहिती दिसेल.

जर तुमचा पॅन निष्क्रिय असल्याचे आढळले, तर तात्काळ आयकर विभागाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. वेळेत खबरदारी घेतल्यास आर्थिक नुकसान आणि कायदेशीर अडचणी टाळता येऊ शकतात. त्यामुळे आजच तुमच्या पॅन कार्डची स्थिती तपासा आणि निश्चिंत रहा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News