Panjab Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून संदर्भात. खरंतर राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिक पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून ठेवली आहे.
आता फक्त मान्सूनची वाट पाहिली जात आहे. मान्सूनचा चांगला समाधानकारक आणि पेरणी योग्य पाऊस पडला की लगेचच शेतकरी बांधव पीक पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत.
अशातच हवामान तज्ञ पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना एक मोठी माहिती दिली आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून अर्थातच 3 जून 2023 पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. मात्र मान्सूनचे आगमन सात जून ते आठ जून दरम्यान राज्यात होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द ; आता केव्हा होणार उदघाट्न?
परंतु पावसाला सुरुवात आज पासूनच होईल असा अंदाज आहे. आजपासून उत्तर महाराष्ट्र अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक तसेच बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, बीड, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेडसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे.
तीन जून पासून जवळपास 10 जून पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. यामध्ये सहा जून पर्यंत पूर्व मौसमी पाऊस पडणार आहे. तर सात जून नंतर येणारा पाऊस हा मान्सूनचा पाऊस राहणार आहे. 16 ते 17 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढणार आहे.
हे पण वाचा :- विविध शेती कामे करण्यासाठी ‘हा’ ट्रॅक्टर ठरणार वरदान ! किंमतही आहे परवडणारी, वाचा….
20 जून पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात मान्सूनचा पाऊस पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. जून महिन्यात यंदा ज्या भागात नेहमी जून महिन्यात कमी पाऊस पडतो अशा भागात अधिक पावसाची शक्यता तयार होत आहे.
अहमदनगर, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यात जून महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
तसेच यंदा गेल्या वर्षी सारखाच दमदार मान्सून राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. 27 जून पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या जातील असे देखील त्यांनी यावेळी नमूद केल आहे.
हे पण वाचा :- ‘या’ जिल्ह्यात आगामी दोन दिवस वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा