Panjabrao Dakh Advice : पंजाबराव डख हे एक ज्येष्ठ हवामान तज्ञ असून ते एक प्रयोगशील शेतकरी देखील आहेत. त्यांच्याकडे दहा एकर जमीन असून ते आपल्या जमिनीत सोयाबीन आणि हरभरा या पिकाची प्रामुख्याने शेती करतात. विशेष बाब म्हणजे त्यांना या पिकाच्या शेतीतून चांगली कमाई होते. दरम्यान त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
डखं यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पावसाळा चांगला राहणार आहे. मान्सूनचे आगमन 8 जूनला महाराष्ट्रात होणार आहे. यानंतर 22 जून पर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. यामुळे जून अखेर महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र खरीप हंगामातील पेरण्या होऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी मान्सून 2023 बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षी प्रमाणेच म्हणजेच 2022 प्रमाणेच यंदा मान्सून हा समाधानकारक राहणार आहे. यावर्षी जूनच्या तुलनेत जुलैमध्ये आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यासोबतच त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! 9 एप्रिल ते 11 एप्रिल ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा
पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना हा सल्ला दिला
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादकांनी कापूस लागवड चार बाय दोन किंवा पाच बाय दोन या अंतरावर करायची नाही. तर कापसाची लागवड तीन बाय एक या अंतरावर करायची आहे. म्हणजेच दाट कापूस लागवड करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. दाट कापूस लागवड केली तर एकरी चार बॅग कापूस बियाणे लागणार आहे.
तसेच कापसाची या पद्धतीने लागवड केली अन एक बॅग खताची दिली की विक्रमी उत्पादन मिळू शकते असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी कापूस लागवड करताना सर्वप्रथम पाळी पाडा आणि रोटावेटर मारून जमिनीची मशागत करून घ्यावी. यानंतर शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे कापूस वाण लागवड करावी.
हे पण वाचा :- वंदे भारत ट्रेन नंतर आता शिर्डी जाणाऱ्या भाविकांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळणार ! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….
कापसाची पेरणी पाऊस पडल्यानंतर लगेचच केली तर अधिक उत्पादन मिळते पेरणीस उशीर झाला तर उत्पादनात घट होत असते. त्यांच्या मते, कापसाची लागवड झाल्यानंतर कापूस पिक दोन पानावर आलं की लगेचच खुरपणी केली पाहिजे. अशा पद्धतीने तन नियंत्रण केले म्हणजे उत्पादनात हमखास वाढही होत असते.
ते सांगतात की, कापसाच्या एका झाडाला जर वीस बोंड लागली तर एकरी दहा क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजरीत्या मिळते. निश्चितच, डखं यांनी दिलेला हा सल्ला शेतकऱ्यांसाठी उपयोगाचा ठरेल. तसेच अशा पद्धतीने नियोजन करून शेतकरी बांधव लाखोंची कमाई करतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा :- दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! या विभागात निघाली मोठी भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज