Panjabrao Dakh : पंजाबरावांचा फेब्रुवारी महिन्यातील हवामान अंदाज आला रे…! शेतकऱ्यांनों सावधान ; असं राहणार संपूर्ण महिन्यात हवामान, 5 अन 6 फेब्रुवारीला….

Ajay Patil
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज मोठ्या प्रमाणात गाजत आहे. डख यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात 24 जानेवारीपासून ते 28 जानेवारीपर्यंत पाऊस कोसळेल असं भाकीत वर्तवलं होतं.

दरम्यान त्यांचा हा अंदाज सत्यात उतरला. 24 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. मराठवाड्यातही पाऊस कोसळला. नासिक मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्या ठिकाणी ही पाऊस झाला. एवढेच नाही तर विदर्भात विशेषता पूर्व विदर्भात अधिक पावसाची शक्यता डखं यांनी वर्तवली त्या ठिकाणी देखील पाऊस कोसळला असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान आता पंजाबराव डखं यांनी फेब्रुवारी महिन्यातील आपला अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 1 फेब्रुवारीपासून राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. राज्यात कडाक्याची थंडी पडणार असून प्रत्येकाला स्वेटर घालावे लागणार आहेत. मात्र हे वातावरण पाच तारखेपर्यंत कायम राहील त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात हवामानात मोठा बिघाड होणार आहे. 5 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा राज्यात ढगाळ हवामान तयार होणार आहे.

5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत हे ढगाळ हवामान राहू शकते असा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. दरम्यान 6 फेब्रुवारी नंतर ही राज्यात वातावरणात बिघाड राहण्याची शक्यता आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात अद्याप त्यांनी पावसाची शक्यता असलेला कोणताच अंदाज वर्तवलेला नाही.परंतु येत्या काही दिवसात फेब्रुवारी महिन्यातील सुधारित अंदाज आपण शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक करू असं त्यांनी यावेळी नमूद केल आहे.

निश्चितच एक फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असला तरी देखील पाच आणि सहा फेब्रुवारीला महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना आपल्या रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. बुरशीनाशक तसेच कीटकनाशकांची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागू शकते. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना आखल्या पाहिजेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe