Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. 21 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जोरदार अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला असून शेतकरी बांधवांनी पंजाबरावांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन आखावे असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे पंजाब रावांनी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो याबाबतही माहिती दिली आहे. आज 14 डिसेंबर पासून ते पुढील पाच ते सहा दिवस राज्यात कडाक्याची थंडी राहणार आहे.
राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी राहील. मात्र वीस तारखेला राज्यातील हवामान बिघडणार आहे. 20 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाला हवामान तयार होणार असून 21 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे.
राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार?
21 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे. सर्व दूर पाऊस पडणार नाही मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील. पावसाचा प्रत्येक भागात दोन दोन दिवसांचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे.
यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, पुसद, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, कोकण किनारपट्टी, मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, वैजापूर, गंगापूर, शिर्डी,संगमनेर, दौंड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पंजाब रावांनी केले आहे. एवढेच नाही तर ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी 20 तारखेपर्यंत कांदा काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
खरंतर, राज्यातील कांदा उत्पादक भागांमध्ये आता कांदा पीक हार्वेस्टिंग साठी रेडी झाले आहे. अशा परिस्थितीत जर राज्यात पाऊस झाला तर याचा कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे पंजाबरावांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज जारी केला आहे.