Panjabrao Dakh : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक हवामान अंदाज दिला आहे. यानुसार राज्यात एक एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागातील तज्ज्ञांच्या मते, 31 मार्च रोजी खानदेश, मध्यमहाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
तसेच विदर्भात एक ते दोन एप्रिल पर्यंत पाऊस कायम राहील असा अंदाजही तज्ञांनी वर्तवला आहे. अशातच परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील आपला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. डख यांनी एप्रिल महिन्यात कसा हवामान राहील कुठे पाऊस पडेल याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रासाठी चिंताजनक! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा गंभीर इशारा
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची उशिरा पेरणी केली आहे त्यांनी 5 एप्रिल पूर्वी आपला गहू काढणी करून घ्यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांची हरभरा, कांदा तसेच इतर काही काढणी योग्य पिके असतील त्यांची हार्वेस्टिंग पूर्ण करून सुरक्षित ठिकाणी आपला शेतमाल साठवून ठेवावा. यासोबतच डक यांनी कोकणातील आंबा बागायतदारांनी आपल्या पिकाचे संरक्षण करावे असा सल्ला दिला आहे.
डखं यांनी सांगितले क, शेतकऱ्यांनी आपली आवश्यक शेती कामे 5 एप्रिल पर्यंत करून घ्यावी. कारण की राज्यात सहा एप्रिल पासून पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे. 6 एप्रिल पासून ते 9 एप्रिल पर्यंत राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण जवळपास सर्वच विभागात पावसाची शक्यता डक यांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
डखं यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात सहा एप्रिल पासून अहमदनगर, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
तसेच 9 एप्रिल नंतर थोडे दिवस पावसाची उघडीप राहील आणि पुन्हा एकदा 14 एप्रिलपासून वातावरणात बदल होईल असा त्यांचा अंदाज आहे. डख यांनी सांगितले की 14, 15, 16 आणि 17 एप्रिल रोजी राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल, हा पाऊस मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक राहील असा अंदाज त्यांनी बांधला आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता मुंबईमधील ‘या’ मेट्रो मार्गाचे काम होणार जलद, वाचा सविस्तर