पंजाबरावांच कापूस उत्पादकांना अनमोल मार्गदर्शन; येत्या हंगामात एकरी ‘इतक्या’ बियाण्याचा वापर करा, एकरी 10 क्विंटलचा मिळणार उतारा, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Panjabrao Dakh : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा कामाचा सल्ला दिला आहे. वास्तविक पंजाबराव डखं यांनी वर्तवलेला हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाब रावांनी वर्तवलेला हवामान अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून यामुळे त्यांना शेतीचे योग्य नियोजन करण्यास सहाय्य होत आहे.

दरम्यान आता पंजाबरावांनी कापूस पिकाची लागवड करताना कशा पद्धतीने लागवडीचे नियोजन केले पाहिजे, पूर्व मशागत करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, एकरी किती बॅग बियाणं वापरलं पाहिजे, किती अंतरावर लागवड केली पाहिजे यांसारख्या मूलभूत बाबींविषयी महत्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. आज आपण पंजाब रावांनी कापूस पिकातून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी कोणता सल्ला दिला आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस लागवड करताना चार बाय दोन किंवा पाच बाय दोन या पारंपारिक अंतरावर कापसाची लागवड करायची नाही. तर कापसाची लागवड 3×1 या अंतरावर करायची. अंतरावर कापसाची लागवड केलं शेतकरी बांधवांना कापसाचे चार बॅग बियाणं एकरी लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी कापसाचे वाण निवडताना परिसरात इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना ज्या वाणातून अधिकच उत्पादन मिळतं त्या वाणाची किंवा जातीची निवड करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच लागवड केल्यानंतर एकरी एक खताची बॅग कापूस पिकाला लावण्याचा सल्ला दिला आहे. पंजाबरावांच्या मते असं शेतकरी बांधवांनी लागवडीचे नियोजन केलं तर एका कपाशीच्या झाडाला वीस बोंड लागतील आणि जर इतकी बोंड कपाशीला लागली तर एकरी दहा क्विंटल पर्यंतचा उतारा शेतकऱ्यांना मिळू शकतो. याशिवाय पंजाब रावांनी पूर्व मशागत करताना जमीन नागरन्याऐवजी पाळे घालून रोटावेटर फिरवण्याचा सल्ला दिला आहे.

याशिवाय कापसाची लागवड करताना ऊशिरा लागवड न करता लवकरात लवकर लागवड करण्याचा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे. त्यांच्या मते शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात पाऊस पडल्यानंतर लगेचच कापसाची लागवड केली पाहिजे. शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतर लगेचच कापसाची लागवड केली तर त्यांना कापसाचा अधिक उतारा या ठिकाणी मिळणार आहे.

उशिरा लागवड केल्यास मात्र शेतकऱ्यांना पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही असं देखील यावेळी पंजाब रावांनी नमूद केलं. याशिवाय तण नियंत्रण करताना पीक दोन पानावर आलं की लगेच खुरपणी करण्याचा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे. असं केल्यास कापूस पिकासाठी पोषक परिस्थिती तयार होते आणि एकरी उताऱ्यात वाढ होते असे देखील मत पंजाबरावांनी व्यक्त केलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe