पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र; पाऊस, वादळ, महापूर, गारपीट, दुष्काळ याचा निसर्गाच्या संकेतावरून अंदाज कसा लावायचा? डख यांनी याबाबत दिली मोठी माहिती

Ajay Patil
Published:
Punjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh On Monsoon : भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. जवळपास 80 टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित असून यामुळे मान्सूनकडे शेतकऱ्यांचे मोठे बारीक लक्ष लागून असते. दरम्यान यंदा अमेरिका सारख्या प्रगत देशातील हवामान विभागाने यावर्षी एलनिनो या हवामान प्रणालीमुळे भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळ पडेल अस भाकित वर्तवल आहे.

यामुळे यंदाचा मान्सून जर चांगला झाला नाही तर काय होईल? याची फक्त कल्पना करूनच शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. दरम्यान अमेरिकेच्या या अंदाजावर काही भारतीय तज्ञांनी आक्षेप घेतला आहे. तज्ञांच्या मते एलनिनो बाबत आत्तापासूनच अंदाज वर्तवणे चुकीचे असून याबाबत एप्रिल महिन्यात ज्यावेळी भारतीय हवामान विभागाचा मान्सूनचा पहिला अहवाल येईल त्यावेळीच योग्य ती स्पष्टोक्ती येऊ शकणार आहे.

तसेच अमेरिकन हवामान विभागाच्या अंदाजावर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील आक्षेप नोंदवला असून एलनिनो असो अथवा नसो महाराष्ट्रात ठरलेल्या वेळेतच पाऊस येईल असा अंदाज बांधला आहे. यासोबतच डखं यांनी यवतमाळ येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान निसर्गाच्या संकेतावरून हवामानाचा अंदाज कसा बांधायचा याविषयी मोठी माहिती दिली आहे. 

हे पण वाचा :- पुणे, अहमदनगरकरांना मिळणार गोड बातमी ! पुणे-अहमदनगर रेल्वे सुरु होणार, रेल्वे बोर्डाच्या सदस्याने दिली माहिती

डख यांच्या मते हवामानात झालेल्या बदलामुळे आता महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची वेळ पुढे सरकली आहे. गेल्या पाच ते सात वर्षांपासून मान्सून आता जूनच्या शेवटच्या आठवड्यातच महाराष्ट्रात दाखल होतो आणि खरीप हंगामातील पेरण्या देखील जुन अखेरच पूर्ण होतात. तसेच गेल्या चार वर्षांपासून मान्सून हा पूर्वेकडून दाखल होत असल्याने राज्यात अतिवृष्टी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यासोबतच हवामान अंदाज बांधण्यासाठी निसर्गाच्या संकेताचा उपयोग होतो असं त्यांनी सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावर्षी मे महिन्यात जोराने वारे वाहू लागतात त्यावर्षी हमखास जून महिन्यात हमखास पाऊस येतो, मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. म्हणजेच मे महिन्यात जोराने वारे वाहतात आणि हे वारे थांबल्यावर साधारण एक महिन्यात मान्सून आपल्या राज्यात येत असतो.

दरम्यान त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा २०२२ प्रमाणेच मान्सून राहणार आहे. म्हणजेच या वर्षी देखील चांगला पाऊस राहणार आहे. मान्सूनचे आगमन यंदा महाराष्ट्रात आठ जूनला होईल आणि 22 जून पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहचेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे. डख सांगतात की, जर समजा जून महिन्यात दिवस मावळत असताना पूर्व दिशेला आभाळ लाल-तांबडे झाले की तेथून पुढील 3 दिवसांत पाऊस हा ठरलेलाच असतो.

हे पण वाचा :- सातारा, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार, ‘या’मुळे बसणार खिशाला कात्री

यासोबतच जर मृग नक्षत्रामध्ये म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर चिमण्या मातीत लोळू लागल्या, अंघोळ करू लागल्या तर तेथून पुढील चार दिवसात पाऊस हा हमखास येत असतो. याशिवाय ज्या महिन्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्य उगवताना सूर्याजवळ ढग जमा झाले आणि त्याला तपकिरी रंग आला की त्यापुढील 10 दिवसांत निश्चित पाऊस हा पडतो. यासोबतच त्यांनी डोंगर जवळ आल्यासारखे दिसू लागले की 24 तासांत पाऊस येतो अशी माहिती यावेळी दिली आहे.

दुष्काळ केव्हा पडतो हे कसं ओळखणार?

बिब्याच्या (खानदेशात याला भिलावा म्हणून ओळखला जात) या झाडाला अधिक प्रमाणात जर फुलधारणा झाली तसेच मोठ्या प्रमाणात जर गावरान आंबे पिकलेत, गावरान आंब्याचे सर्वाधिक उत्पादन झाले तर अशावेळी त्यावर्षी दुष्काळ हा पडत असतो अशी माहिती डखं यांनी यावेळी दिली आहे. यासोबतच कावळ्याने झाडाच्या उंच शेंड्यावर म्हणजे मध्यभागी घरटे न करता थेट शेंड्यावर घरटे केले की त्यावर्षी पाऊस हा कमी होत असतो असं देखील निरीक्षण त्यांनी नोंदवल आहे.

हे पण वाचा :- नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली किमया, बनला लखपती

केव्हा पडतो समाधाकारक पाऊस

डख सांगतात की, कडुलिंबाच्या झाडाला ज्यावेळी भरपूर फळे म्हणजेच लिंबोळ्या लागतात त्यावर्षी चांगला पावसाळा राहतो. जर चिंचेच्या झाडाला अधिक चीनचा लागल्या तर त्यावर्षीही चांगला पाऊस होतो. तसेच जर कावळ्याने झाडाच्या मध्यभागी घरटे बांधले तर त्यावर्षी होणारा पाऊस हा समाधानकारक असतो.

यासोबतच जर सरड्याने जूनच्या पहिल्या आठवड्याचा आसपास आपल्या डोक्यावरील कलर बदलला, लाल केला तर तेथून पुढील दहा दिवसांत पावसाची शक्यता तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासोबतच इतरही अनेक नैसर्गिक एंडिंकेटरच्या माध्यमातून पाऊस केव्हा येईल याचा अंदाज लावता येत असल्याची माहिती या कार्यक्रमादरम्यान डख यांनी दिली आहे.

हे पण वाचा :- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात शिपाई पदासाठी निघाली मोठी भरती; पगार मिळणार तब्बल 81 हजार, पहा कसा…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe