Panjabrao Dakh : पंजाबराव डख हवामान अंदाज सांगणं बंद करणार? पहा नेमकं काय आहे हे प्रकरण

Ajay Patil
Published:
Panjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : गेल्या काही वर्षांपासून आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर दिवसेंदिवस विश्वास वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मते, डखं यांचा हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांना शेती व्यवसायात योग्य व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होत आहे. डखं आपला हवामान अंदाज आठ ते दहा दिवस अगोदरच वर्तवत असल्याने यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे पावसाचा अंदाज बांधून करता येणे शक्य बनत आहे.

मात्र अशातच काही शेतकऱ्यांनी डखं यांना आपला हवामान अंदाज सांगणे बंद करावे असे आवाहन केल आहे. पंढरपूरच्या एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने पंजाब डक यांना फोन करून अशी मागणी केली आहे. या शेतकऱ्याने डक यांना फोन करून सांगितले की, तुमचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत आहे मात्र यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! राज्यात वाळूचे लिलाव बंद; आता 8 हजाराची वाळू मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात घरपोच, महसूलमंत्री पाटील…

या शेतकऱ्याने दिलेल्या युक्तिवादानुसार, पंजाबरावांचा अंदाज पाहून शेतकरी बांधव घाईघाईने हार्वेस्टिंग साठी तयारी करत असतात. शिवाय याचा फायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो आणि कमी दरात द्राक्ष माल खरेदी केला जातो. एकंदरीत पंजाबरावांच्या हवामान अंदाजामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला असून पुढील काही दिवस त्यांनी आपला अंदाज देणे थांबवावे अशी मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे.

याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली असता अनेक शेतकऱ्यांनी डख यांना आपला हवामान अंदाज असाच सूरु ठेवण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मते काही मोजक्या शेतकऱ्यांचे या हवामान अंदाजामुळे नुकसान होत असेल पण राज्यातील लाखो कांदा, भाजीपाला तसेच इतर पिकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. यामुळे पंजाबरावांनी आपला हवामान अंदाज देणे असच सुरु ठेवावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीच्या पाण्याची चिंता मिटली; 21 वर्षीय युवकाने शोधलं भन्नाट तंत्रज्ञान, असा होणार शेतकऱ्यांना फायदा

कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान

दरम्यान पंजाब रावांनी 26 मार्चपर्यंत महाराष्ट्रात हवामान खराब राहणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र 26 मार्चपर्यंत जरी हवामान खराब राहिले तरी देखील राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही. परंतु राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंजाबरावांनी मार्च महिन्यात वर्तवलेले आपले सर्व अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडून हवामान विभागापेक्षा डखं यांचेच अंदाज विश्वासनीय असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अवकाळीच्या तोंडावर ‘त्या’ 12 हजार शेतकऱ्यांना मिळालेत 40 कोटी रुपये; तुम्हाला लाभ मिळाला की नाही?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe