देशामध्ये मोठ्या संख्येने निवृत्त झालेले कर्मचारी असून निवृत्तीनंतर आर्थिक दृष्टिकोनातून अशा कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ती म्हणजे पेन्शन अर्थात निवृत्तीवेतन होय. याच महत्त्वाच्या असलेल्या निवृत्तीवेतना संदर्भात आता केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
व हा निर्णय तसे पाहायला गेले तर पेन्शनधारकांच्या फायद्याचाच आहे. जेव्हा या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा देशातील लाखो पेन्शनधारकांना याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे व यामध्ये ज्या काही मानसिक त्रासदायक बाबी होत्या त्या देखील आता बंद होणार आहे.

पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून काढता येणार पैसे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील लाखो पेन्शनधारकांना फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीची महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आलेली आहे. पेन्शन संदर्भातील एक नवा बदल जानेवारी 2025 पासून पूर्ण देशात लागू होणार आहे व या बदलानुसार बघितले तर आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढता येणे शक्य होणार आहे.
याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मंडावीया यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, देशातील 78 लाख इपीएस पेन्शन धारक या निर्णयाचे लाभार्थी ठरणार आहेत. एवढेच नाहीतर केंद्रीय रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून याबद्दल एक अधिकृत पत्रक देखील जारी करण्यात आलेले आहे.
त्यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देशात कुठल्याही ठिकाणी पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनची रक्कम म्हणजेच पैसे मिळवता येणार आहेत. केंद्राने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता खूप मोठा फायदा होणार आहे. निवृत्त झालेल्या व्यक्तींना ठराविक बँकेत जाऊनच पेन्शन मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता व तो आता या बदलामुळे कमी होणार आहे.
इतकेच नाही तर सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमच्या मदतीने आता संपूर्ण देशात पेन्शन वितरणामध्ये मदत होणार असून त्यामुळे पेन्शन पेमेंटचे ऑर्डर ट्रान्सफर करण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या परिस्थितीत बघितले तर पेन्शनधारकांना जर एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी किंवा बँकेची शाखा बदललेली तर पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करणे गरजेचे होते.
परंतु आता ही समस्या राहणार नाही व ही प्रक्रिया जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे व त्यामुळे आता पेन्शन खाते सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमशी जोडले जाणार आहे व व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांच्या खात्यात सहजपणे ही पेन्शनची रक्कम जमा होणार आहे.