Pension News : पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात. यातीलच सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे पेन्शन. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन दिली जाते.
मात्र आता सरकारकडून काही लोकांची पेन्शन बंद करण्यात आली आहे. यामुळे पेन्शन धारकांचे धाबे दणाणले आहेत. खरे तर पेन्शन धारकांना पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास वेळोवेळी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात.

पेन्शन धारकांना पेन्शनचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.
पेन्शन धारक जिवंत आहेत की नाही आणि योग्य व्यक्तीला लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यंदाही शासनाकडून नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले गेले होते.
यानुसार देशभरातील लाखो पेन्शन धारकांनी जीवन प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली होती आणि या मुदतीत अनेकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले आहे.
मात्र ज्या पेन्शन धारकांनी या मुदतीत जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांची पेन्शन आता थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केलेल्या पेन्शन धारकांची पेन्शन आता रद्द करण्यात येणार आहे.
पेन्शन थांबली असेल तर काय करावे लागणार
ज्या पेन्शन धारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नसेल त्यांची पेन्शन आता थांबणार आहे. दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर न केल्याने तुमची पण पेन्शन थांबली असेल तर तुम्ही चिंता करण्याचे काहीही कारण नाही.
जर तुमची पेन्शन लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे ब्लॉक झाली असेल, तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तुम्ही आवश्यक असणारे पुरावे, कागदपत्रे सादर करताच तुमची पेन्शन पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
मात्र, यासाठी काही दिवस लागू शकतात. लाइफ सर्टिफिकेट सादर न करणाऱ्या लोकांची पेन्शन उशिराने त्यांच्या खात्यात जमा होईल. जेव्हा लाइफ सर्टिफिकेट सादर होईल तेव्हाच पेन्शन सुरू होणार आहे.













