Numerology:- ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे एकमेकांशी निगडित आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार. ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म वार किंवा त्याचा जन्म दिनांक व इतर ग्रहताऱ्यांच्या आधारित संबंधित व्यक्तीचे भविष्य वर्तवले जाते. परंतु अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो व या मूलांकावरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच त्याची आयुष्यातील प्रगती इत्यादी बऱ्याच बाबतीमध्ये भविष्य वर्तवलेले असतं.
अगदी आपण अंकशास्त्रामध्ये बघितले तर ज्या व्यक्तींचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झालेला असतो त्या व्यक्तींचा मूलांक हा 6 असतो. अंकशास्त्रानुसार बघितले तर आयुष्यामध्ये या लोकांना खूप मानसन्मान मिळतो व खूप नाव देखील कमावतात व कमी वयामध्ये भरपूर संपत्ती कमवतात.
सहा मुलांक असलेल्या व्यक्तींचे भविष्य कसे असते?
1- कमी वयामध्ये होतात श्रीमंत- कोणत्याही महिन्याच्या सहा, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक सहा असतो. अशा व्यक्ती जीवनामध्ये खूप धनसंपत्ती कमवतात आणि कमीत कमी वयामध्ये हे लोक श्रीमंत होतात. तसेच आयुष्यामध्ये ते कुठल्याही क्षेत्रात खूप नाव मिळवतात आणि कमीत कमी वयात भरपूर संपत्तीचे मालक देखील होऊ शकतात.
2- पैसा खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत- अंकशास्त्रानुसार बघितले तर ज्या व्यक्तींचा मुलांक सहा असतो असे लोक कोणताही विचार न करता खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात.
खर्चाच्या बाबतीत कंजूसपणा केलेला यांना अजिबात आवडत नाही व जीवनामध्ये भरपूर पैसा कमावतात देखील व खर्च देखील मोठ्या प्रमाणावर करतात. सहा मुलांक असलेल्या लोकांना बऱ्याचदा दारू पिण्याचे म्हणजेच मद्यपान करण्याचे व्यसन देखील लागते. ज्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये जीवनात त्यांना भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागते.
3- खूप मित्र बनवतात आणि मित्रता निभावतात- सहा मुलांक असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व बघितले तर त्यांचा व्यवहार खूप चांगला असतो व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे लोक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.
महत्त्वाचे म्हणजे या लोकांचे अनेक मित्र असतात व मनापासून मैत्री देखील ते निभावत असतात. सहा मुलांक असलेल्या लोकांचे कितीही वय झाले तरी ते नेहमी चिरतरुण असतात. कुठल्याही प्रकारच्या अवघड समस्या आल्या तरी त्यांचा सामना ते हसत खेळत करतात व टेन्शन घेत नाहीत.
4- सुख समृद्धीने भरलेले आयुष्य जगतात- मुलांक सहा असलेल्या लोकांचा स्वामीग्रह पाहिला तर तो शुक्र ग्रह आहे. शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे सहा मुलांक असलेले लोकांच्या जीवनामध्ये भरपूर यश मिळते. विशेष म्हणजे या लोकांना फिरायला देखील खूप आवडते व ते भरपूर सुख सुविधा असलेल्या आयुष्य जगतात. त्यांना एकदम लक्झरी म्हणजेच आरामदायी आयुष्य जगायला खूप आवडते.
(टीप- वरील माहिती वाचकांसाठी निव्वळ माहिती म्हणून सादर केलेली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन किंवा त्याविषयी दावा करत नाहीत.)