PF Account Balance Check : देशातील कोट्यावधी कामगार आपल्या पगारातून ठराविक भाग प्रोविडेंट फंडमध्ये अर्थातच पीएफ मध्ये जमा करत असतात. हा पीएफ चा भाग कर्मचाऱ्यांचा पगारातून ऑटोमॅटिक कट केला जातो. शिवाय या प्रोविडेंट फंडमध्ये जमा झालेल्या पैशांना सरकारकडून व्याज देखील दिले जाते.
अशा परिस्थितीत अनेकांना आपल्या पीएफ अकाउंटमधील रकमेवर सरकारने किती व्याज दिले आहे? पीएफ अकाउंट मध्ये सध्या किती पैसा जमा आहे? याबाबत जाणून घ्यायचे असते. मात्र पीएफ मधील रक्कम कशा पद्धतीने चेक करायची याबाबत अनेकांना माहिती नसते.

अशा परिस्थितीत आज आपण पीएफ खात्यातील रक्कम कशा पद्धतीने चेक केली जाऊ शकते ते देखील इंटरनेट शिवाय याविषयी बहुमूल्य माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पीएफ खात्यातील जमा झालेली रक्कम जाणून घेण्याची प्रोसेस सविस्तर.
हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा
कशी चेक करणार PF खात्यातील रक्कम
जर तुम्हाला इंटरनेट शिवाय पीएफ खात्यातील रक्कम बघायची असेल तर यासाठी तुम्हाला एक मिस कॉल द्यावा लागेल किंवा आपण एक एसएमएस करून देखील पीएफ खात्यामधील रक्कम सहजतेने तपासून शकता. सर्वप्रथम आपण एसएमएस करून पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता याविषयी माहिती घेऊया.
यासाठी आपल्याला आपल्या ईपीएफओ खात्यात रजिस्टर असलेल्या नंबर वरून EPFO UAN MAR असा मॅसेज 7738299899 या मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे. मेसेज केल्यानंतर तुम्हाला काही मिनिटातच पीएफ खात्यातील रकमेचा सविस्तर तपशील एसएमएस केला जाईल.
हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ लिंक रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईचा प्रवास होणार मात्र 25 मिनिटात, पहा….
या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्या की जर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असेल तर आपण EPFO UAN ENG असा मेसेज सेंड करा आणि हिंदी मध्ये जर पीएफ खात्याचा तपशील हवा असेल तर EPFO UAN HIN असा मेसेज टाईप करावा लागेल.
याशिवाय आपण मिस कॉल देऊन देखील पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. यासाठी 011 22901406 या क्रमांकावर आपल्या ईपीएफओ खात्यात रजिस्टर केलेल्या नंबर वरून मिस कॉल द्यावा लागेल. मिस कॉल दिल्यानंतर आपण आज आपल्या पीएफ खात्यातील रकमेचा सर्व तपशील मिळून जाणार आहे.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुलै महिन्यात शिंदे सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, वेतनात होणार वाढ