Mango Pickle : घरच्या घरी लोणचे ! असे बनवा अनेक वर्षे नाही होणार खराब …

Published on -

Mango Pickle : आपल्याकडे लोणच्याचे विविध प्रकार असले तरी दरवर्षी उन्हाळात घरोघरी कैरीचे लोणचे आवडीने बनवले जाते. उन्हाळ्यात सर्वत्र कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. त्यामुळे कच्ची कैरी निवडून वर्षभर टिकणारे लोणचे तुम्ही घरच्याघरी बनवू शकतात.

लोणचे वर्षभर खराब होऊ नये म्हणून पुढील काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चांगल्या दर्जाची कच्ची कैरी निवडावी. जर तुम्हाला लोणचे जास्त काळ ठिकवून ठेवायचे असेल तर यासाठी तुम्हाला योग्य कच्ची कैरी निवडावी लागेल. कैरी कच्ची आणि कडक असणे खूप महत्त्वाचे आहे. थोडाशी पिकलेली कैरीदेखील लोणच्याची चव खराब करू शकते. म्हणूनच कैरी खरेदी करताना ती कच्ची असल्याची खात्री करा.

काचेचे किंवा चिनी मातीची बरणी वापरावी. आंब्याचे लोणचे बनवल्यानंतर ते ठेवण्यासाठी काचेचे भांडे सर्वात योग्य मानले जाते. जर तुम्हाला चिनी मातीच्या भांड्यात लोणचे ठेवायचे नसेल तर तुम्ही ते काचेच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवू शकता. लोणचे प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका,

कारण त्यामुळे ते खराब होण्याचा धोका वाढतो. बऱ्याचदा कैरीचे लोणचे खराब होते. परंतु यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लोणचे खराब होते. अशा परिस्थितीत कैरीचे लोणचे पटकन खराब होऊ नये, म्हणून काही ट्रिक आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक वर्षेभर लोणचे बरणीत ठेवू शकता.

बरणीची स्वच्छता ठेवावी. कैरीचे लोणचे बरणीत भरण्यापूर्वी ती बरणी स्वच्छ आहे का याची खात्री करा. कारण, बरणी स्वच्छ नसेल तर त्यामध्ये बुरशी वाढण्याचा धोका असतो. ज्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या, जेणेकरून लोणचे अनेक वर्षे टिकेल. चांगल्या तेलाचा वापर करावा.

लोणचे जास्त काळ टिकून राहावे, असे वाटत असेल तर त्यात चांगल्या तेलाचा वापर करावा. कैरीच्या लोणच्यामध्ये चव आणण्यासाठी तेल खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेहमी चांगले तेल निवडा. उत्तम दर्जाचे मोहरीचे तेल वापरणे चांगले. तसेच लोणच्यामध्ये भरपूर तेल टाकावे.

लोणचे काढण्याची पद्धत पुढील प्रमाणे तुम्ही कैरीचे लोणचे काचेच्या भरणीत भरून सुरक्षित ठेवले असेल पण ते काढताना काळजी घेणे फार गरजेचे आहे. लोणचे जास्त दिवस टिकायचे असेल तर स्वच्छतेची काळजी घ्या. अस्वच्छ चमच्याने किंवा हाताने लोणचे बाहेर काढणे टाळा. लोणचे नेहमी हवाबंद डब्यात आणि थंड ठिकाणी ठेवावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe