Pik Vima Update : शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे अतिशय कवडीमोल असे उत्पादन मिळत असतं. कधी अतिवृष्टी कधी गारपीट कधी दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असते. परिणामी या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी या अनुषंगाने केंद्र शासनाच्या माध्यमातून पिक विमा योजना राबवली जात आहे.
पिक विमा योजनेच्या माध्यमातून पिकाचा विमा काढला जातो आणि नुकसान झाल्यानंतर संबंधित पिक विमा काढलेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही पिक विमा कंपन्यांकडून दिली जाते. दरम्यान आता याच पीक विमा संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता खरीप हंगामात पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची आणि मोठी कामाची बातमी आहे. खरं पाहता पिक विमा योजनेअंतर्गत काही नियम आहेत, ज्यामध्ये नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित पिक विमा कंपनीला याबाबत तक्रार द्यावी लागते.

अशा परिस्थितीत खरीप हंगामात पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत संबंधित पिक विमा कंपनीकडे तक्रार दिली. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण होऊन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देऊ करण्यात आली. मात्र असे असले तरी देखील राज्यातील दहा ते बारा लाख शेतकरी बांधवांना क्लेम करूनही पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळालेली नव्हती.
अशा परिस्थितीत या संदर्भात वारंवार वेगवेगळ्या संघटनांकडून मागणी जोर धरत होती. यासंदर्भात पाठपुरावा केला असता संबंधित पिक विमा कंपन्यांकडून पिक विमा प्रीमियम भरण्यासाठी दिला जाणारा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा निधी वितरित झाला नसल्याची बाब विमा कंपन्यांकडून सांगितले जात होती.
यामुळे आता राज्य शासनाकडून 13 जानेवारी 2023 रोजी यावर महत्वपूर्ण असा निर्णय घेतला गेला असून राज्य शासनाच्या हिस्याचा 724 कोटी 51 लाख 46 हजार 809 रुपये संबंधित पिक विमा कंपन्यांना अदा करण्याबाबत एक शासन निर्णय जारी झाला आहे.
दरम्यान आता हा निधी संबंधित पिक विमा कंपन्यांकडे पोहोचला असल्याने पिक विमा नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांची राहिली असेल त्यांना लवकरात लवकर पिक विमा नुकसान भरपाई मिळेल असा आशावाद जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे.
पिक विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याबाबतचा 13 जानेवारी 2022 चा शासन निर्णय