पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ‘या’ 3 पैकी कोणतेही एक झाड लावा ! साप चुकूनही तुमच्या घराजवळ फिरकणार नाहीत

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका वाढतो आणि यामुळेच पावसाळ्यात विशेष काळजी घ्यायला हवी असे आवाहन केले जाते. विशेषता जे लोक शेतात राहतात किंवा ज्यांचे घर जंगलाशेजारी आहे अशा लोकांनी या दिवसांमध्ये अधिक सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

Published on -

Snake Viral News : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. खरे तर सापांचा धोका बाराही महिने असतो मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका वाढतो. कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरते आणि यामुळे ते निवाऱ्यासाठी मानवी वस्तीकडे येतात. निवाऱ्यासाठी तसेच अन्नाच्या शोधात साप बहुतांशी वेळा घरांमध्ये घुसण्याची भीती असते. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक खास उपाय घेऊन आलो आहोत. आज आपण अशा काही झाडांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांची लागवड घराजवळ केल्यास साप चुकूनही घराच्या आसपास फिरकणार नाहीत.

या झाडांची लागवड केल्यास साप नेहमी दूर राहतात

दवणा : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Artemisia pallens असे आहे. दवणा ही एक सुगंधी वनस्पती आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ही वनस्पती अ‍ॅस्टेराशिए कुळातली आहे. याचा वापर पूजेची सामग्री तसेच गजरा, वेणी यांत केला जातो. दवण्याच्या पानांचा वापर धार्मिक कार्यांमध्ये सुद्धा होतो यामुळे या वनस्पतीला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. याचे सुगंधी तेल सुगंधचिकित्सा, अर्थात अरोमाथेरपीमध्येही वापरले जाते अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या वनस्पतीचा जो तीव्र वास येतो तो तीव्र वास आपल्याला आवडत असला तरी तो सापांना अजिबात आवडत नाही. यामुळे या वनस्पतीची घराजवळ लागवड केल्यास सापांचा धोका कमी होतो असे म्हटले जाते.

तुळशी : हिंदू धर्मीय लोकांच्या घरापुढे तुळशीचे रोपटे हमखास पाहायला मिळते. कारण म्हणजे तुळशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक विवाहित स्त्री दररोज सकाळी तुळशीची पूजा करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करत असते. तुळशी ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे. दरम्यान हिच धार्मिक आणि औषधी वनस्पती सापांचा धोका कमी करू शकते. घरापुढे जर तुळशीची लागवड केलेली असेल तर तुमच्या घराच्या आसपास साप फिरकणार सुद्धा नाहीत असा दावा केला जातो. तुळशीमध्ये सापांना दूर ठेवण्याचे गुणधर्म असतात असे म्हटले जाते.

सर्पगंधा : सर्पगंधा ही देखील तुळशी आणि दवणा या वनस्पतींप्रमाणेच एक औषधी वनस्पती आहे. ही औषधी वनस्पती वेगवेगळ्या आजारांमध्ये गुणकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आयुर्वेदात सर्पगंधाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. महत्वाची बाब अशी की सर्पगंधा या वनस्पतीचा तीव्र वास सापांना अजिबात सहन होत नाही यामुळे जिथे या वनस्पतीची लागवड केलेली असते तिथे साप अजिबात जात नाहीत. त्यामुळे या झाडांची तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही जर लागवड केली तर सापांचा धोका बऱ्यापैकी कमी होणार असा दावा केला जात आहे.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!