PNB FD Scheme : भारतात एकूण 12 पब्लिक सेक्टर बँका आहेत. यातील बहुतांशी बँक आपल्या ग्राहकांना त्याच डिपॉझिट वर चांगले व्याज देतात. एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांसारख्या सरकारी बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अलीकडे एफडीवर चांगले व्याज देत आहेत.
पण रिझर्व बँक ऑफ इंडिया ने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि यामुळे देशभरातील विविध बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांच्या व्याज दरात कपात करण्यात आली आहेत. याशिवाय बँकांनी एफडी व्याजदर देखील कमी केले आहेत.

यामुळे कर्ज घेतलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा दिलासा मिळाला आहे तर फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसतोय. पण आजही पब्लिक सेक्टर मधील पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 390 दिवसांच्या एफ डी वर चांगले व्याज देते.
पंजाब नॅशनल बँकेची 390 दिवसांची FD योजना कशी आहे?
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफ डी ऑफर करते. या कालावधीच्या एफ डी वर बँकेकडून 3.25 टक्क्यांपासून ते 7.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. बँकेकडून सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिक व्याज दिले जाते.
बँकेच्या 390 दिवसांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर यात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना बँकेकडून 6.70% दराने व्याज दिले जात आहे. तसेच या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना बँकेकडून 0.50 टक्के अधिकचे म्हणजेच 7.20% दराने व्याज दिले जात आहे.
अर्थात सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेची 390 दिवसांची एफडी योजना अधिक फायद्याची ठरते.
तीन लाखांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?
जर समजा पीएनबी मध्ये 390 दिवसांसाठी तीन लाख रुपयांची एफडी केली तर सामान्य ग्राहकांना म्हणजे 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांना मॅच्युरिटी वर तीन लाख 22 हजार 73 रुपये मिळणार आहेत. अर्थातच सामान्य ग्राहकांना तीन लाखाच्या गुंतवणुकीतून 22 हजार 73 रुपयांचे व्याज मिळेल.
दुसरीकडे याच एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना तीन लाख 23 हजार 768 रुपये मिळणार आहेत. अर्थात ज्येष्ठ नागरिकांना तीन लाखाच्या गुंतवणुकीतून 23 हजार 768 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील.