खिशाला परवडेल अशा किमतीत पोकोने लॉन्च केला ‘हा’ स्मार्टफोन! मिळेल 8 जीबी रॅम आणि बरच काही….

Smartphone In Affordable Price:- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना परवडेल अशा किमतींमध्ये उत्तम अशी फीचर्स असलेली स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेली आहेत.

त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या खिशाला परवडेल किंवा तुमच्या बजेटमध्ये राहील असा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला बाजारामध्ये अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत

स्मार्टफोन बाजार बघितला तर यामध्ये असे स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत की तेतुम्हाला दहा हजार रुपये पर्यंत मिळतील व त्यामध्ये मिळणारे वैशिष्ट्ये देखील भरपूर प्रमाणात असतील व परफॉर्मन्स देखील दमदार असेल.

अगदी याच अनुषंगाने जर आपण बघितले तर अनेक दिवसापासून चर्चेत राहिल्यानंतर आता पोकोने आपला POCO C75 हा स्मार्टफोन अखेर जागतिक बाजारामध्ये सादर केला असून त्यामध्ये आठ जीबी रॅम, 120Hz रिफ्रेश रेट तसेच मीडिया टेक हिलिओ जी 85 आणि 5160mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे.

सध्या हा जागतिक पातळीवर लॉन्च करण्यात आला असून भारतीय बाजारपेठेत देखील लवकरात लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.

पोकोने लॉन्च केला POCO C75 स्मार्टफोन

कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला पोको सी 75 अखेर पोको कंपनीने जागतिक बाजारात सादर केला असून या फोनमध्ये आठ जीबी रॅम तसेच 5160mAh बॅटरी क्षमतेसह अनेक उच्च दर्जाचे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

जर आपण या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स बघितले तर या फोनमध्ये 6.88 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह एचडी+ रिझोल्युशनला सपोर्ट करेल असा एलसीडी पॅनलवर बनवलेला डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट वर चालेल. तसेच पोको सी 75 हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर लॉन्च होईल जो एमयुआयवर चालेल. प्रोसेसिंग करिता या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हिलीओ जी 85 ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. जो दोन गिगा हर्ट्स पर्यंतच्या क्लॉक स्पीड वर चालू शकतो.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार बघितले तर हा स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरीएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये सहा जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज तर टॉप मॉडेलमध्ये आठ जीबी रॅम सोबत 256 जीबी स्टोरेज दिले जाणार आहे.

 कसा आहे या स्मार्टफोनचा कॅमेरा?

फोटोग्राफीसाठी पोको सी 75 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून जो गोलाकार कॅमेरा मोड्युल मध्ये आहे. तसेच यामध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मेन सेंसर तसेच 0.08 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.

पावर बॅकअप करिता या स्मार्टफोनमध्ये 5160mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते तसेच ही बॅटरी वेगाने चार्ज होण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 18 वॉट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

 किती आहे पोको सी 75 स्मार्टफोनची किंमत?

या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत साधारणपणे नऊ हजार शंभर रुपये इतकी असून या बेस मॉडलमध्ये सहा जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे.

तसेच या स्मार्टफोनच्या आठ जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेल साधारणपणे 129 डॉलर म्हणजेच भारतीय किमतीमध्ये दहा हजार आठशे रुपयांना मिळणार आहे.

सध्या हा स्मार्टफोन जागतिक पातळीवर विकला जात असून लवकरच भारतीय बाजारपेठेत देखील तो ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.