तरुणांसाठी खुशखबर ! राज्यात पुन्हा पोलीस भरती आयोजित होणार; तब्बल 2 हजार रिक्त पदे भरली जाणार, वाचा याविषयी सविस्तर

Published on -

Police Bharati Maharashtra 2023 Latest Update : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना पोलीस विभागात नोकरी करायची आहे अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की राज्यातील कारागृह विभागात लवकरच काही रिक्त पदासाठी मोठी भरती आयोजित होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील कारागृह विभागात पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र असे असले तरीही 2000 रिक्त पदे आहेत. यामुळे कारागृह विभागात कार्यरत असलेल्या सध्याच्या कर्मचाऱ्यांवर रिक्त पदांच्या कामाची देखील जबाबदारी येत आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! 25 एप्रिल ते 27 एप्रिल राज्यातील ‘या’ भागात गारपीट होणार; आणखी काय म्हटले डख, पहा…

त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून कारागृह विभागाच्या माध्यमातून आता 2,000 रिक्त कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. राज्यातील कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत ज्या तरुणांना पोलीस विभागात नोकरी करण्याची आशा आहे अशा तरुणांना लवकरच राज्यातील कारागृह विभागाच्या माध्यमातून गुड न्यूज मिळणार असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन पदभरती प्रक्रियेमध्ये राज्यातील कारागृह विभागाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी तसेच कारागृह कर्मचारी यांची संख्या अधिक राहणार आहे. गेल्या वर्षात राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये वेगवेगळे आजाराने मोठ्या प्रमाणात कैद्यांचा मृत्यू झाला आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! तुरीच्या दरात विक्रमी वाढ ; आणखी ‘इतके’ वाढणार भाव, पहा काय म्हणताय जाणकार

गेल्या वर्षात जवळपास 120 कैद्यांचे वेगवेगळ्या आजाराने निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर आता कैद्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हेच कारण आहे की, राज्यातील कारागृह विभागाच्या माध्यमातून रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

एकंदरीत राज्यातील कारागृह विभागात लवकरच एक मोठी भरती आयोजित होणार असून या भरतीच्या माध्यमातून रिक्त असलेली 2000 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे पोलीस विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना पुन्हा एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे एवढे नक्की.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! रखरखत्या उन्हात ‘या’ अतिमहत्वाच्या मेट्रो मार्गावरील फेऱ्या वाढवल्या, आता Metroचा प्रवास होणार अधिक सुसाट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe