पोलिसांनी चुकी नसतानाही वाहनाचे चालान कापले? घाबरू नका, ‘येथे’ करा तक्रार लगेच होईल कार्यवाही

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : आपण सर्वजण नेहमीच प्रवास करतो. काही लोक कामानिमित्त, शिक्षणानिमित्त इतर कारणाने प्रवास करत असतात. जेव्हा आपण आपल्या वाहनाने प्रवास करत असतो मग ते कोणतेही असो दुचाकी असो, तीनचाकी असो किंवा चारचाकी असो आपण नियमात असणे गरजेचे आहे.

रस्त्यावर वाहन चालवताना आपण सर्व कागदपत्रे सोबत ठेवायला हवीत. तसेच नियमीत नियमात आपले वाहन चालावयास हवे. परंतु काही लोकांच्या मनात असाही प्रश्न आहे की, जर आपण नियमात असू तरीही जर आपले चुकीचे चालान कापले,

काही चुकी नसतानाही चालान दिले गेले तर काय करावे? याची तक्रार कोठे, कशी करावी? तर तुम्ही नियमात असाल व तरीही चालान कापले गेले तर तम्ही तक्रार करू शकता. तुम्हाला त्याबद्दल तक्रार करण्याचा अधिकार आहे.

चला त्याविषयी जाणून घेऊयात. याठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेऊयात –

जाणून घ्या प्रोसेस

तुम्हाला चुकीचे ट्रॅफिक चालान जारी केले असेल तर तक्रार करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तक्रार करण्यासाठी तुम्ही echallan.parivahan.gov.in या साईटवर जाऊ शकता.

येथे लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला चुकीचे ट्रॅफिक चालान कापले जात असल्याची तक्रार करण्याचा ऑप्शन समोर दिसेल. येथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

तक्रार नोंदवली पण त्यावर काय कार्यवाही झाली ते कसे पाहावे?

यासाठी तुम्हाला तुमच्या तक्रारीचा स्टेटस चेक करावे लागेल. हे चेक करण्यासाठी तुम्ही https://echallan.parivahan.gov.in/gsticket/ या वेबसाइटवर जा. या वेबसाइटवर तुम्हाला ई-चलानचा पर्याय उपलब्ध होईल. येथे तुम्ही तिकीट स्टेटस हा पर्याय दिसेल.

त्यावर जाऊन तुम्ही ई-तिकीट किंवा ई-चलानचा तक्रार क्रमांक प्रविष्ट करा. कॅप्चा कोड टाका आणि नंतर स्टेटस चेकवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली किंवा सध्या या तक्रारीचा काय स्टेटस आहे ते तुम्हाला समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe