Popular destinations in Maharashtra 12 व्या शतकातले पुरातन मंदिर आणि लेणी, कुंड, धबधबा सार काही ! नक्की भेट द्या महाराष्ट्रातील…

Ahmednagarlive24
Updated:

Popular destinations in Maharashtra :- महाराष्ट्रातील एकंदरीत पर्यटन स्थळांचा विचार केला तर यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा प्रथम क्रमांक घ्यावा लागेल. कारण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण स्थळे असून हा जिल्हा जास्त करून डोंगर रांगांनी वेढलेला असल्यामुळे अनेक पर्यटन स्थळे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. यामध्ये आपण वेरूळ तसेच अजिंठाच्या लेणी, दौलताबाद फोर्ट, औरंगाबाद शहरात असलेले सिद्धार्थ उद्यान आणि बीबी का मकबरा आणि अनेक व्ह्यू पॉईंट आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यात फिरताना पाहायला मिळतात.

या जिल्ह्याला एक ऐतिहासिक परंपरा असल्यामुळे अनेक छोटे-मोठे किल्ल्यांचे दर्शन देखील आपल्याला या जिल्ह्यात होत असते. अगदी याच पद्धतीने जर तुमचा या पावसाळ्यामध्ये एखाद्या अभयारण्याला भेट देण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी जळगाव व औरंगाबाद या जिल्ह्यात पसरलेले गवताळा अभयारण्य हे ठिकाण खूप मनमोहक ठरू शकते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये गौताळा अभयारण्य बद्दल महत्त्वाची माहिती घेऊ.

 पर्यटनच्या दृष्टिकोनातून गौताळा अभयारण्य आहे महत्त्वाचे

औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या कन्नड तालुक्यात हे अभयारण्य पसरलेले असून यामध्ये 17 गावातील वनक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. औरंगाबाद कडून जाताना कन्नड  तालुक्याच्या जवळ हे अभयारण्य असून कन्नड च्या पुढे गेल्यानंतर अनेक झाडे आणि मोठे मोठे फुलांची झाडे देखील तुम्हाला बघायला मिळतात. यावर असलेला विविध प्रकारच्या पक्षांचा अधिवास तुमचे लक्ष वेधून घेतो. या ठिकाणी एक चंदन नावाचा नाला असून या नाल्याच्या पुढे गेल्यास तुम्हाला एक मारुतीचे देऊळ दिसते व या मंदिरासमोरच गवताळा नावाचा तलाव आहे.

या तलावाच्या नावावरून या अभयारण्याला गौताळा अभयारण्य हे नाव पडलेले आहे. यामध्ये बांबू, पळस तसेच रान शेवगा, कडुलिंब, चिंच तसेच पिंपळ यासारखी वनसंपदा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि विविध प्रकारचे वृक्षसंपदा आणि वेली देखील या ठिकाणी असल्यामुळे पावसाळ्यात डोळ्यांचे पारणे फिटेल असे हिरवेगार दृश्य या ठिकाणी बघायला मिळते. तसेच सांबर, हरीण, तरस, कोल्हे, लांडगे, गवे इत्यादी सारखे चोपन्न प्रजातींचे प्राणी या ठिकाणी बघायला मिळतात.

तसेच बुलबुल व कोतवाल, सुगरण आणि सातभाई सारख्या पक्ष्यांच्या 230 जाती या ठिकाणी आढळून येतात. या ठिकाणी गुहा असून यामध्ये पाण्याची टाकी आहे. या गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. याची एक आख्यायिका असून ती म्हणजे या गुहेत गौतम ऋषिंनी तपश्चर्या केली होती व त्यावरूनच या ठिकाणी गौतम टेकडी हे नाव पडलेले आहे. तसेच या अभयारण्यजवळ पाटणा येथे निकुंभराज वंशांनी 12 व्या शतकात बांधलेले एक पुरातन मंदिर आहे.

एवढेच नाही तर या ठिकाणी असलेल्या चंडिका मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध गणित आणि खगोल तज्ञ भास्कराचार्य यांचे मोठे पीठ देखील आहे. पुरातन मंदिरे तसेच महादेवाचे मंदिरे, लेणी, केदार कुंड, सीता खोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा पौराणिक ठिकाणांमुळे या अभयारण्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

गौताळा अभयारण्याला कसे जाता येईल?

हे अभयारण्य औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या कन्नड या शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे. कन्नड शहरापासून चाळीसगाव कडे येताना दोन किलोमीटर अंतरावर एक फाटा फुटतो व या फाट्याने सरळ गेल्यास आपण या अभयारण्याच्या गेट जवळ पोहोचतो. तसेच चाळीसगाव रेल्वे स्टेशन देखील साधारणपणे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe