Post Office Scheme : अलीकडे आरबीआयने रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेट मध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील विविध बँकांकडून एफडीचे व्याजदर सुद्धा कमी करण्यात आले आहेत.
मात्र आजही देशातील सरकारी बचत योजनांचे आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर कायम आहेत. म्हणूनच अनेक जण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हालाही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे.

कारण आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला दमदार परतावा मिळणार आहे. आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे तुम्ही तुमच्या पत्नीच्या समवेत एकदा गुंतवणूक करून दरमहा 9 हजार रुपये फिक्स व्याज मिळवू शकता.
यामुळे तुमच्या संसाराला नक्कीच मोठा हातभार लागणार आहे. या फिक्स इन्कम मुळे तुमच्या संसाराच्या काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे.
कोणती आहे ही योजना?
आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला फिक्स व्याज मिळते.
या योजनेअंतर्गत दिले जाणारे व्याज दरमहा थेट तुमच्या बचत खात्यात वर्ग केले जाते. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे म्हणजेच ही योजना पाच वर्षात परिपक्व होते. योजनेचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यात तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण रक्कम जमा केली जात असते.
या योजनेत तुम्ही एकल खाते उघडले म्हणजेच सिंगल अकाउंट ओपन केले तर तुम्हाला जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा करता येतात. तसेच जर तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन केले तर तुम्हाला जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात.
म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नी समवेत जॉईंट अकाउंट ओपन करून या योजनेत कमाल 15 लाख रुपयांची इन्वेस्टमेंट करू शकतात आणि या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला एक निश्चित व्याज सुद्धा मिळणार आहे. या योजनेच्या व्याजदराबाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 7.4% दराने व्याज दिले जात आहे.
कसे मिळणार महिन्याला 9,000 ?
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये सध्या 7.4% दराने व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही या योजनेत तुमच्या पत्नी समवेत जॉईंट अकाउंट ओपन केले आणि यात एकदा 14 लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 9,003 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत.
हे दरमहा व्याज तुम्हाला योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे, म्हणजेच पाच वर्ष हे व्याज मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे व्याज थेट तुमच्या बचत खात्यात जमा केले जाणार आहे.