Post Office च्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 5,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर थोडे थांबा, पोस्टाच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याआधी आजची बातमी पूर्ण वाचा. कारण की, आज आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांपासून मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसतोय. कारण की, देशातील सर्वच प्रमुख बँकांकडून एफडी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. मात्र, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर आजही कायम आहे. आरबीआयकडून रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय झाल्यानंतर देशातील बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केलेत.

मात्र पोस्टाच्या बचत योजनांचे व्याजदर स्थिर राहिले आहेत. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास ग्राहकांना चांगला फायदा मिळणार आहे. दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिसची एफडी योजना कशी आहे ? 

खरे तर, पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट बचत योजना राबवली जात आहे. या योजनेला टीडी योजना म्हणून ओळखली जाते आणि या योजनेचे स्वरूप बँकांच्या FD योजनेसारखे आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची एफडी योजना असे सुद्धा म्हणतात. 

पोस्टाची ही एफडी योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. यातील एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने व्याज दिले जात आहे. दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.

तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे. याशिवाय, पाच वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.

पोस्टाच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

पोस्ट ऑफिसकडून सुरु करण्यात आलेल्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत सध्या स्थितीला गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे. यानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना सध्याच्या 7.50% व्याजदरानुसार मॅच्युरिटीवर म्हणजेच 60 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सात लाख 24 हजार 149 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 2,24,149 रुपये ग्राहकांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.

मात्र पोस्टाच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांना जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक ग्राहकांना सुद्धा मिळते. दुसरीकडे बँकांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांच्या तुलनेत सीनियर सिटीजन ग्राहकांना अधिकचे व्याज दिले जात आहे.

परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केले असल्याने सध्याची स्थिती पाहिली असता पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणे हाच पर्याय सामान्य ग्राहकांसाठी तसेच जेष्ठ नागरिक ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!