पोस्ट ऑफिसची श्रीमंत बनवणारी योजना ! दररोज 50 रुपये गुंतवा आणि तब्बल 35 लाखांचे मालक बना !

तुम्हालाही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची आहे का मग आजचा लेख तुमच्याच कामाचा आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जी बेसिकली एक विमा योजना आहे आणि ज्यातून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचे रिटर्न मिळतात. 

Published on -

Post Office Scheme : तुम्हालाही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे रिस्की वाटते का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकाराची माहिती पाहणार आहोत.

खरे तर देशात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणून बँकेची एफडी योजनेला प्राधान्य दिले जाते याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जिथे दररोज 50 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्ही तब्बल 35 लाखांचे मालक बनू शकतात.

हो अगदीच बरोबर वाचताय तुम्ही फक्त पन्नास रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही तब्बल 35 लाखांचे मालक होऊ शकता पण यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत सातत्य ठेवणे आवश्यक राहणार आहे.

अवघ्या काही रुपयांची गुंतवणूक तुम्हाला कशा पद्धतीने लाखो रुपयांचे धनी बनवू शकते याचा संदर्भातील डिटेल माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पोस्टाची ही योजना बनवणार श्रीमंत

पोस्ट ऑफिस कडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राम सुरक्षा योजनेचा देखील समावेश होतो. ग्राम सुरक्षा योजना ही पोस्ट ऑफिस ची एक जीवन विमा योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना दहा हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

जर तुम्ही यामध्ये दिवसाला 50 रुपये गुंतवले तर भविष्यात तुम्हाला यातून 35 लाख रुपये मिळणार आहेत. खरंतर एक साधारण माणूस दिवसाला 200 ते 300 रुपयांचा खर्च करतो. मात्र, तुम्ही पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजनेत डेली 50 रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 35 लाखांचे रिटर्न मिळवू शकता. म्हणजेच या योजनेत महिन्याला पंधराशे रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही लखपती बनू शकता.

योजनेत गुंतवणुकीच्या अटी काय आहेत?

पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजनेत फक्त भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत 19 वर्षांवरील नागरिकांना गुंतवणूक करता येते. 19 वर्ष ते 55 वर्षे वयोगटातील नागरिकांना पोस्टाच्या ग्रामसुरक्षा योजनेत पैसा गुंतवता येतो.

या योजनेत किमान दहा हजार आणि कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते म्हणजेच दहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही आणि दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येत नाही.

कसे मिळतात 35 लाख ?

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राम सुरक्षा योजनेत दररोज 50 रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना 35 लाख रुपयांचा पूर्ण फायदा मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 80 व्या वर्षी या योजनेची ही रक्कम बोनससह मिळते.

जर याच्या गुंतवणूकदाराचा 80 व्या वर्षाच्या आधी मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला म्हणजे नामांकित व्यक्तीला ही पूर्ण रक्कम मिळते. यात मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करता येते.

जर तुम्ही 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी केली तर 55 वर्षांपर्यंत तुम्हाला 1515 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागणार अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. म्हणजेच दिवसाला साधारणतः 50 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe