5 वर्षात तब्बल 2.24 लाखांचा फायदा होणार! पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल

तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची आहे का मग आज आम्ही तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट बचत योजनेची माहिती हजर झालो आहोत. आज आपण अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये पाच लाखाची गुंतवणूक केल्यास दोन लाख रुपये निव्वळ व्याज म्हणून मिळणार आहेत. 

Published on -

Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा आहे का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर, सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की सर्वप्रथम बँकांची एफडी योजनेचा पर्याय आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.

बँकांच्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो, शिवाय बँकांच्या एफडी योजनेमधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.

पण जर तुम्हाला बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करायची नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा पर्याय निवडू शकता. पोस्ट ऑफिस कडून वेगवेगळ्या बचत योजना चालवल्या जात आहेत.

अशा परिस्थितीत तुम्ही पोस्टाच्या एखाद्या बचत योजनेत तुमच्याकडील पैसा गुंतवून चांगले रिटर्न मिळू शकणार आहात. खरेतर, आपली मेहनतीची कमाई सुरक्षित आणि भरघोस परतावा देणाऱ्या ठिकाणी गुंतवावी, असे प्रत्येकाला वाटते.

म्हणून जर तुम्हालाही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसची नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेटला (NSC) प्राधान्य देऊ शकतात. दरम्यान आता आपण ही योजना नेमकी कशी आहे? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम ?

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम बाबत बोलायचं झालं तर ही योजना भारत सरकारच्या हमीवर चालते. म्हणजेच या ठिकाणी केलेले गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे गुंतवणूकदारांचा पैसा कुठेच जाणार नाही.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.7% वार्षिक व्याजदर आणि परतावा दिला जातोय. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

एक हजार रुपयांची गुंतवणूक करूनही गुंतवणूकदारांना या योजनेचे खाते ओपन करता येते आणि या योजनेचा लॉक-इन पिरेड हा पाच वर्षांचा आहे. तसेच, या योजनेत कंपाउंडिंग व्याजाचा सुद्धा लाभ मिळतो. यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पाच वर्षानंतर चांगला मोठा फंड मिळतो. 

5 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

 पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना पाच वर्षानंतर सात लाख 24 हजार 513 रुपये मिळणार आहेत म्हणजेच दोन लाख 24 हजार 513 रुपये रिटर्न म्हणून मिळतील. NSC योजनेत 10 वर्षांखालील मुलांच्या नावाने सुद्धा खाती उघडता येतात.

पण अशा प्रकरणांमध्ये एनएससीचे खाते त्यांचे पालक ऑपरेट करतील. या योजनेचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे यातून निश्चित परतावा तर मिळतोच शिवाय कर सवलत सुद्धा मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत दिली जाते. म्हणून NSC योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News